Maharashtra Cabinet Expansion, Devendra Fadnavis : केंद्र सरकारप्रमाणेच राज्यातील फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या काही अनुभवी नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते, असे एका खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांचे पुन्हा कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकते असे सांगण्यात येतेय. त्याशिवाय पुण्यातील सुनल शेळकेंनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रीपद मिळण्याची शक्यता, खात्रीलयाक सूत्रांनी वर्तवली आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील शेळके यांना सुद्धा मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सुनील शेळके राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार आणि अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्यांना मंत्रिमंडळात स्थान देत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्याचा प्रयत्न सुनेत्रा पवार यांच्याकडून करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते आहे. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसकडून फेरबदल होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. सध्याच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार असल्याचीही चर्चा दबक्या आवाजात सुरू झालेली आहे. मुंडे यांचे मंत्रिमंडळात कमबॅक होणार असल्याचे समजलेय. तर सुनील शेळकेंना राज्यमंत्रिपद दिले जाणार आहे. आता कोणत्या मंत्र्यांचा पत्ता कट होणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दुसरीकडे केंद्रातही मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे बोलले जातेय. शिवसेनेला केंद्रात २ मंत्रिपदे दिली जाऊ शकतात, असेही सांगण्यात येतेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.