Cabinet Meeting: राज्याला मिळणार आणखी एक न्यायालय, फडणवीस सरकारचे ४ मोठे निर्णय; कोणत्या जिल्ह्यांना फायदा होणार?

Maharashtra cabinet meeting: राज्यमंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ४ मोठे निर्णय घेतले.
Cabinet Meeting: राज्याला मिळणार आणखी एक न्यायालय, फडणवीस सरकारचे ४ मोठे निर्णय; कोणत्या जिल्ह्यांना फायदा होणार?
Cabinet MeetingSaam Tv
Published On
  • फडणवीस सरकारची आज महत्वाची मंत्रिमंडळ बैठक पार पडली

  • मंत्रिमंडळ बैठकीत आज ४ मोठे निर्णय घेतले गेले

  • नाशिक पिंपळगाव बसवंत येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यात येणार

  • नागपूरमध्ये लता मंगेशकर विद्यापीठ स्थापन होणार

Maharashtra Cabinet Decisions August: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये फडणवीस सरकारने ४ मोठे निर्णय घेतले. क्रीडा विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महसूल व वन विभाग आणि विधि व न्याय विभागाअंतर्गत हे निर्णय घेण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्याला आणखी एक न्यायालय मिळणार आहे. आजच्या मंत्रिमंडळात घेण्यात आलेल्या या निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या जिल्ह्यांना होणार ते आपण जाणून घेणार आहोत...

- क्रीडा विभागांतर्गत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या राज्यातील खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना दिल्या जाणाऱ्या रोख बक्षिस धोरणात सुधारणा करण्यात आली आहे.

Cabinet Meeting: राज्याला मिळणार आणखी एक न्यायालय, फडणवीस सरकारचे ४ मोठे निर्णय; कोणत्या जिल्ह्यांना फायदा होणार?
Maharashtra Government Land: 16 वर्षांनंतर सरकारी जमीन वाटपाचा मार्ग मोकळा; सोडत बंद, आता लिलावातून मिळणार भूखंड, जाणून घ्या नवं धोरण

- उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. नागपूर येथे लता मंगशेकर विद्यापीठ स्थापन होणार आहे. तसेच अहिल्यानगर येथे डॉ. बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे . या खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठात वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, फिजिओथेरपी आणि नर्सिंग विद्याशाखांमधील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशॅलिटी अभ्यासक्रम सुरु होणार आहे.

Cabinet Meeting: राज्याला मिळणार आणखी एक न्यायालय, फडणवीस सरकारचे ४ मोठे निर्णय; कोणत्या जिल्ह्यांना फायदा होणार?
Maharashtra politics : ठाकरेंनंतर पवारांना धक्का? ६ खासदार अस्वस्थ, माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ; नेमकं काय म्हणाले?

- महसूल व वन विभाग सोलापूर जिल्ह्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला. जत नगरपरिषदेला प्रशासकीय इमारत उभारणीसाठी मौजे जत (जि. सांगली) येथील २ हजार ५८५ चौ. मीटर शासकीय जमीन देण्यास मान्यता देण्यात आली.

- विधि व न्याय विभागांतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी एक महत्वाचा निर्णय आज घेण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय होणार. त्यासाठीची पदे व अनुषांगिक खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.

Cabinet Meeting: राज्याला मिळणार आणखी एक न्यायालय, फडणवीस सरकारचे ४ मोठे निर्णय; कोणत्या जिल्ह्यांना फायदा होणार?
Maharashtra Government: विद्यार्थ्यांना दिलासा! भरती परीक्षा प्रक्रियेत सुधारणा होणार, फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com