Maharashtra Politics: 'सध्यातरी अर्थ खातं माझ्याकडे'; मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा 'अर्थ' काय?

Maharashtra Finance Ministry: सुनेत्रा पवारांना अर्थ खातं मिळणार नसल्याचं जवळपास स्पष्ट झालंय. कारण मुख्यमंत्र्यांनी तसे संकेतच दिले आहेत.नेमकं काय म्हटले मुख्यमंत्री? राष्ट्रवादीला का मिळणार नाही अर्थ खातं? यावरचा हा रिपोर्ट.
Maharashtra Finance Ministry:
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis has indicated that the Finance DepartmentSaam tv
Published On
Summary
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ खाते सध्या स्वतःकडे असल्याचे स्पष्ट संकेत दिले.

  • राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्थ खाते मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा.

  • सुनील तटकरे यांनी अर्थ खात्याचा मुद्दा पक्षाच्या अजेंड्यावर असल्याचे सांगितले होते.

ऐकलं.मुख्यमंत्री काय म्हणाले. महायुतीत राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेलं आणि अनेक वर्षं अजितदादांकडे असलेलं अर्थ खातं आता भाजपकडेच राहणार की काय असे संकेत स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्य़क्ष सुनील तटकरेंनी अर्थ खात्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं.

एवढंच नव्हे तर अर्थ खात्याचा मुद्दा हा राष्ट्रावादीच्या टॉप ऑन द अजेंडा असल्याचंही त्यांनी भर पत्रकार परिषदेत सांगितंलं. आता मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय अशी चर्चा सुरू असली तरी दोन दिवसांतच मुख्यमंत्र्यांनी या मुद्यातील हवाच काढून घेतल्याचं बोललं जातंय.

Maharashtra Finance Ministry:
UP Politics: मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजपमध्ये नाराजी उफाळली? माजी खासदाराच्या विधानाने खळबळ

सरकारमध्ये गृह, अर्थ आणि नगरविकास ही महत्त्वाची आणि मलईदार खाती मानली जातात. महायुतीचं सरकार आल्यानंतर तिन्ही पक्षांमध्ये या तीन खात्यांचं वाटप करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी गृह खातं स्वत:कडे ठेवलं तर अर्थ खातं अजितदादांना देण्यात आलं. एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खातं सोपवण्यात आलं.

Maharashtra Finance Ministry:
NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षांची मोठी प्रतिक्रिया; भाजपवर डागली तोफ

मात्र अजितदादांच्या मृत्यूनंतर त्यांच्याकडील केवळ उत्पादन शुल्क खातं सुनेत्रा पवाराकडे सोपवण्यात आलंय. मात्र अर्थखातं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे ठेवलं. आता पाच महिने झाले तरी राष्ट्रवागदी अर्थ खात्याची प्रतीक्षा करतंय. त्यामुळेच विरोधकांना टीका करण्याचं आयतं कोलीत मिळालंय.

आपल्या पक्षातले मंत्री, आमदार आणि त्यांच्या मतदारसंघांना निधीची कमतरता पडू नये म्हणून अर्थ खात्यावर सर्वांचाच डोळा असतो. त्यामुळेच दादांनी मोठ्या शिताफीने तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे ठेवल्या होत्या. मात्र आता या चाव्या मुख्यमंत्र्यांकडे आल्या. त्यामुळे आता आलेल्या चाव्या पुन्हा राष्ट्रवादी आणि सनेत्रा वहिनींना मिळणार नसल्याचेच संकेतच मुख्यमंत्र्यांनी आपल्या विधानातून दिलेत का ? अशी चर्चा रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com