Maharashtra Budget 2026: अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री अर्थसंकल्प मांडणार, अर्थ - नियोजन खातं देवेंद्र फडणवीसांकडे?

CM Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याचा अर्थसंकल्प कोण सादर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करतील.
CM Devendra Fadnavis
CM Devendra FadnavisSaam Tv
Published On

Summary -

  • अजित पवारांच्या निधनानंतर अर्थमंत्रीपदाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे जाण्याची शक्यता

  • 23 फेब्रुवारीपासून महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार

  • देवेंद्र फडणवीस हेच यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प मांडणार असल्याचे जवळपास निश्चित

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातामध्ये निधन झाले. अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थमंत्रीपद कुणाकडे जाणार आणि कोण अर्थसंकल्प मांडणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच अर्थसंकल्पाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचा अर्थसंकल्प मांडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

२३ फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. अचानक अजित पवारांचे निधन झाले त्यामुळे अर्थसंकल्प कोण मांडणार असा प्रश्न निर्माण झाला होता. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनीच राज्याचा अर्थसंकल्प मांडला होता. त्यामुळे आता अजित पवारांच्या निधनानंतर तूर्तास अर्थ आणि नियोजन खाते मुख्यमंत्र्यांकडे जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे अर्थ खातं स्वत:कडे घेऊन अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता आहे.

CM Devendra Fadnavis
Ajit Pawar Funeral: सुनेत्रा वहिनींना हात देत सुप्रिया सुळेंनी सावरलं, अजितदादांना अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर; पाहा VIDEO

गेल्या ६ वर्षांपासून अजित पवार हे राज्याचा अर्थसंकल्प मांडत होते. पण आता अजित पवार यांचे निधन झाले. त्यामुळे अर्थखात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेतील आणि ते राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील हे आता निश्चित झाले आहे. अजित पवार यांनी आतापर्यंत सर्वाधिक वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. अजित पवार यांनी त्याच्या कारकिर्दीत एकूण १० वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला होता. अजित पवार यांनी आता देखील राज्याचे उपमुख्यमंत्रीपदासोबत अनेक जबाबदाऱ्या सांभालल्या होत्या.

CM Devendra Fadnavis
Ajit Pawar Plane Crash:...तर असं काही घडलंच नसतं; २७ वर्षे अजितदादांसोबत असलेल्या ड्रायव्हरनं सांगितला तो अखेरचा संवाद

दरम्यान, अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये निधन झाले. बुधवारी सकाळी पावणे नऊ वाजता ही घटना घडली. अजित पवार यांच्या बारामतीमध्ये ४ सभा होणार होत्या. या सभांसाठी ते मुंबईवरून बारामतीला जात होते. त्याचवेळी बारामती विमानतळाजवळ त्यांचे विमान अचानक कोसळले. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि विमानाचे तुकडे झाले होते. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ५ जणांचा जागीच मृत्यू झाला होता.

CM Devendra Fadnavis
Ajit Pawar Death: अजितदादांना भरसभेत ‘I Love You’ म्हणणारा कार्यकर्ता ढसाढसा रडला; म्हणाला, दादांना मेसेज पाठवला अन्...VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com