Ajit Pawar Death: अजितदादांना भरसभेत ‘I Love You’ म्हणणारा कार्यकर्ता ढसाढसा रडला; म्हणाला, दादांना मेसेज पाठवला अन्...VIDEO

Ajit Pawar Viral I Love You Worker Emotional: अजित पवार यांच्या प्रचारातील व्हायरल ‘I Love You’ क्षणाची आठवण अंत्यविधीच्या ठिकाणी भावूक झाली. कार्यकर्त्याच्या अश्रूंनी उपस्थितांचे डोळे पाणावले.

महाराष्ट्रासाठी बुधवारची सकाळ धक्कादायक ठरली. राज्यावर जबर आघात झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीमध्ये भीषण अपघातात निधन झाले. या बातमीने सुन्न झाला आहे. सर्वत्र शोकलहर निर्माण झाली असून कार्यकर्त्यांपासून तर सामन्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. राज्याच्या राजकारणातील दादा माणूस अशी ओळख असलेले तडफदार आणि झंझावती नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. यावेळी राज्यातील सर्वच नेत्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. महापलिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवार यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत होता. यामध्ये एक कार्यकर्ता अजित दादांना I love U असे म्हणाला होता. त्यावेळी अजित दादा मिश्किलपणे म्हणाले, घरी जाऊन बायकोला आय लव्ह यु म्हण आणि घड्याळाचे बटन दाब. यावेळी एकच हशा पिकला होता. त्याच कार्यकर्त्याने अंत्यविधीच्या ठिकाणी आठवणींना उजाळा देत अश्रु अनावर झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com