राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होतेय. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्याकडून अद्याप कोणत्याच गटाला पाठिंबा देण्याबाबत निर्णय झाला नव्हता. मात्र अधिवेशनात त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसल्याने चर्चांना उधाण आले आहे. नवाब मलिक यांनी अखेर अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला नागपुरमध्ये (Winter Session Nagpur) सुरूवात होत आहे. २० डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात सध्या मनी लॉंड्रिंग प्रकरणात जामिनावर बाहेर असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) ही सहभागी झालेत. मात्र नवाब सभागृहात अजित पवार गटासोबत सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसणार की शरद पवार गटाला पाठिंबा देत विरोधकांची भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
मात्र सभागृहात नवाब मलिक यांनी सत्ताधारी नेत्यांच्या रांगेत बसत शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का दिलाय. नवाब मलिक सर्वात शेवटी सत्ताधारी बाकांवर जाऊन बसले. त्यामुळे अजित पवार गटाला (Ajit Pawar) त्यांनी पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नवाब मलिक हे वर्षभरापासुन अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी नव्हते. तसेच त्यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही अजित पवार गटात जाणार की शरद पवारांना साथ देणार याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केली नव्हती. मात्र त्यांनी आज विधानसभा कामकाजाला हजेरी लावत शरद पवार गटाला धक्का दिला आहे. सभागृहात जाण्यापुर्वी ते अजित पवार गटाच्या अनिल पाटील यांच्या कार्यालयातही जाऊन बसले होते. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.