अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने काल म्हणजे ६ डिसेंबर रोजी दादरमधील भरतक्षेत्र या साडीच्या दुकानावर धाड टाकली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांना मुंबईत ५-६ ठिकाणी झाडाझडतीही घेतली. यात अनेक कागदपत्रांची तपासणी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. मनी लॉन्ड्रीच्या अनुषंगाने ईडी तपास करत असल्याची माहिती समोर येत आहे.
भरतक्षेत्र साडीचे दुकान आणि दुकानाचे मालक मनसुख गाला यांच्या घरावर ईडीने बुधवारी धाड टाकली होती. या धाडीत ईडीने तब्बल १५ लाख रुपयांची कॅश जप्त केल्याची माहिती आता समोर आली आहे.
ईडीने भरतक्षेत्रचे मालक मनसुख गाला, त्यांचे चार्टर्ड अकाउंटंट आणि इतरांच्या एकूण पाच ठिकाणांवर छापे टाकले होते. या सर्व ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांना कसून तपासणी केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तब्बल १२ तास हे सर्च ऑपरेशन सूरू होते. २०१९ साली बांधकाम व्यवसायिक अरविंद शहा यांच्या तक्रारीवर दाखल झालेल्या फसवणूक आणि फॉर्जरीच्या प्रकरणात हे सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. (Latest News Update)
बांधकाम क्षेत्रातील एका कंपनीत अरलविंद शहा आणि मनसुख गाला हे दोघे भागीदार आहेत. मात्र गाला यांनी बेकायदेशीररित्या शहा यांच्या कुटुंबाचे कंपनीतील ५० टक्के भाग २५ टक्क्यांवर आणल्याचा शहांचा आरोप आहे. ज्याने त्यांना तब्बल ११३ कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याप्रकरणात मनी लॉन्ड्रीच्या अनुषंगाने ईडी तपास करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.