Nashik Water Cut News : नाशिककरांची चिंता वाढली! अल निनोच्या इशाऱ्यामुळे आठवड्यातून २ दिवस पाणी कपातीची शक्यता

Nashik Water Cut News : १ जुलैपर्यंत शहराची तहान भागवण्यासाठी ५३०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आलंय. तर गंगापूर धरणातील ६०० दशलक्ष घनफूट मृत पाणीसाठा वापरण्याबाबत लवकरच निर्णय होणार आहे.
Nashik Water Cut News
Nashik Water Cut NewsSaam TV
Published On

Nashik News :

हवामानातील बदल आणि सुपर अल निनोच्या इशाऱ्यामुळे नाशिककरांचा चिंता वाढली आहे. नाशिककरांवर आठवड्यातून १ दिवस ऐवजी २ दिवस पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

सुपर अल निनोच्या धोक्यामुळे ३१ जुलै ऐवजी ३१ ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्याची नाशिक महापालिकेवर वेळ येऊ शकते. ३१ ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्याची वेळ आल्यास आठवड्यातून २ दिवस पाणीकपातीचा निर्णय पालिका प्रशासनाला घ्यावा लागू शकतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गंगापूर धरणातील मृत जलसाठा वापरता आला नाही तर नाशिककरांवर आधीच आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीची टांगती तलवार असतानाच आता सुपर अल निनोच्या इशाऱ्यामुळे महापालिकेची चिंता वाढली आहे. कारण ३१ जुलैपर्यंत शहराची तहान भागवण्यासाठी ५३०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आलंय. तर गंगापूर धरणातील ६०० दशलक्ष घनफूट मृत पाणीसाठा वापरण्याबाबत लवकरच निर्णय होणार आहे.

Nashik Water Cut News
Nagpur Winter Session 2023 : हिवाळी अधिवेशनात सरकारसमोर मोठं आव्हान; नागपुरात पहिल्याच दिवशी ३ मोर्चे, १७ आंदोलने

मात्र अल निनोच्या धोक्यामुळे पाऊस लांबल्यास महापालिकेवर ३१ जुलैऐवजी ३१ ऑगस्टपर्यंत ते पाणी पुरवण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे आधीच ३१ जुलैपर्यंत पाणीपुरवठ्यासाठी आठवड्यातून १ दिवस पाणीकपात प्रस्तावित असताना ३१ ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्याची वेळ आल्यास आठवड्यातून २ दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय पालिकेला घ्यावा लागू शकतो. त्यामुळे पाऊस लांबल्यास नाशिककरांना आठवड्यातून २ दिवस पाणीकपातीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. (Latest News Update)

नगर-नाशिकच्या राजकीय दबावामुळे जायकवाडीला कमी पाणी

नगर-नाशिकच्या राजकीय दबावामुळे वरच्या धरणातून ८.६० ऐवजी जायकवाडीसाठी ७.८४ टीएमसी पाणी सोडल्याचं समोर आलंय. गोदावरी पाटबंधारे महामंडळाने जायकवाडीसाठी ८.६० टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश नगर-नाशिकला दिले होते. सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेले. मात्र नुकत्याच झालेल्या पावसामुळे वहनव्यय कमी झाल्याचे कारण देत ७.८४ टीएमसीच पाणी सोडले.

Nashik Water Cut News
Aditya Thackeray: दिशा सालियान मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी होणार?

जायकवाडीच्या हक्काचे ०.७६ टीएमसी पाणी कमी सोडण्यात आले आहे. यापूर्वी तीन वेळा वहनव्यय वाढल्याचे कारण दाखवत पाणी कमी सोडण्यात आले होते. त्यामुळे महामंडळाच्या निर्णयाविरोधात अभिजित जोशी यांनी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे तक्रार केली आहे. यापूर्वी अशाच पद्धतीने पाणी कमी सोडण्यात आल्याचा इतिहास आहे. २०१८ मध्ये ८.९९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश होते, प्रत्यक्षात ७.९९ टीएमसीच सोडले. २०१५ मध्ये १२.८४ टीएमसीचे आदेश असताना १०.८४, २०१४ मध्ये ७.८९ ऐवजी ७.१० टीएमसीच पाणी सोडण्यात आले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com