Pune Railway News: फुकट्या प्रवाशांमुळे पुणे रेल्वे मालामाल; महिनाभरात तब्बल इतक्या कोटींचा दंड वसूल

Pune Railway News: बेशिस्त प्रवाशांना वठणीवर आणण्यासाठी रेल्वेने विशेष मोहिम हाती घेत दंड आकारण्यास आकारण्यास सुरुवात केली आहे.
Pune Railway Latest news
Pune Railway Latest news Saam TV
Published On

Pune Railway Latest news

मागील काही दिवसांपासून रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. हीच बाब लक्षात घेता पुणे रेल्वे विभागाने फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. बेशिस्त प्रवाशांना वठणीवर आणण्यासाठी रेल्वेने विशेष मोहिम हाती घेत दंड आकारण्यास आकारण्यास सुरुवात केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Railway Latest news
Maharashtra Winter Session 2023: हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार? सत्ताधारी-विरोधक आमने-सामने येणार; राज्याचे प्रश्न सुटणार?

पुणे रेल्वे विभागाने (Pune Railway) नोव्हेंबर महिन्यात राबवलेल्या विशेष तपासणी मोहिमेत तब्बल २८ हजार विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी सापडले आहेत. या प्रवाशांकडून रेल्वेने २ कोटी ५० लाखांचा दंड वसूल केला आहे. रेल्वेच्या या विशेष मोहिमेमुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे धाबे दणाणले आहे.

या दंडाच्या रक्कमेमुळे पुणे रेल्वे विभागाला (Railway) मोठा फायदा झाला असून प्रवाशांना वचक बसला आहे. तिकिट खिडक्यांवरील रांगेत उभे राहण्याचा कंटाळा, तसेच वेळेची बचत करण्यासाठी अनेकजण विनातिकीट प्रवास करीत आहेत.

त्यातच काही प्रवासी एका श्रेणीचे तिकीट काढून दुसऱ्या श्रेणीतून प्रवास करत असल्याचं दिसून येत आहे. काही प्रवासी थर्ड क्लासचे तिकीट काढून फस्ट क्लासमध्ये देखील प्रवास करीत आहेत. यामुळे इतर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

ही बाब रेल्वे अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांची विशेष मोहिम राबवण्यास सुरुवात केली आहे. पुणे रेल्वे विभागाने नोव्हेंबर महिन्यात राबवलेल्या विशेष मोहिमेत तब्बल २८ हजार बेशिस्त आणि विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी आढळून आले आहेत.

Pune Railway Latest news
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळणार? 'सुप्रीम' सुनावणी पूर्ण; कोर्टात नेमकं काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com