Maharashtra Vidhan sabha Nivadnuk: सध्या महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी सर्वत्र विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. २३ तारखेला मतमोजणाी होणार आहे. यासंदर्भात सकाळ समूहाचा एक्झिट पोल समोर आला आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचं पारडं जड दिसतंय. त्यामुळे याठिकाणी वरुण सरदेसाई यांना जास्तीत जास्त मत मिळण्याची शक्यता आहे. वरुण सरदेसाई याठिकाणी निवडून येऊ शकतात.
वांद्रे पूर्व विधानसभेचे संभाव्य आमदार हे शिवसेना ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई असतील असा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद् काँग्रेसचे झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वरुण सरदेसाई हे आमदार होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये झिशान सिद्दीकी यांचा अवघ्या साडेपाच मतांनी विजय झाला होता आणि त्याला अनेक कारणे कारणीभूत आहेत. त्यामध्ये तृप्ती सावंत हे देखील एक कारण आहे. तृप्ती सावंत हे अपक्ष म्हणून उभ्या होत्या आणि त्यांनी तब्बल साडेपंचवीस हजार मते घेतली होती.
एवढेच नाही तर त्या एमआयएमच्या आणि मनसेच्या उमेदवारीने जवळजवळ साडेदहा ते साडेबारा प्रत्येकी मतं घेतली होती आणि त्यामुळे साडेपाच हजार मतांनी झिशान सिद्दीकी यांचा विजय झाला होता. मात्र २०१९ ची परिस्थिती आता नाही आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसरातून वरुण सरदेसाई यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.