Begging to Be Banned in Maharashtra
Members of the Maharashtra Legislative Council during the passage of the anti-begging bill amid protests.saam tv

Maharashtra Assembly Winter Session: महाराष्ट्रात भीक मागण्यास बंदी येणार; विधानसभेनंतर विधान परिषदेतही विधेयक मंजूर

Begging to Be Banned in Maharashtra: महाराष्ट्र राज्यात भीक मागण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. त्याबाबतचे विधेयक विधीमंडळता मंजूर करण्यात आले आहे. विधान परिषदेत आमदारांच्या गोंधळात हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे.
Published on

राज्यात आता लवकरच भीक मागण्यास बंदी घालण्यात येणार आहे. विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेमध्येही याबाबत विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. सभागृहात गोंधळ सुरू असतानाच हे विधेयक मंजूर करण्यात आलं.त्यामुळे तालिका सभापती नीलम गोऱ्हे, शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे, राष्ट्रवादीचे अमोल मिटकरा यांच्यासह अनेकांनी नाराजी व्यक्त केलीय. विधान परिषदेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर आता सभापतींच्या दालनात शनिवारी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय.

विधान परिषदेत राज्यात भीक मागण्यास प्रतिबंध घालणारे विधेयक मंजूर करण्यात आले. त्यावेळी सभागृहात आमदारांनी गोंधळ घातला होता. राज्याच्या मंत्री अदिती तटकरेंनी हे विधेयक मांडलं होता. मात्र त्यावर आमदार मनीषा कायंदे, अमोल मिटकरी आणि तालिका सभापती निलम गोर्हे यांनी त्यावर असमाधान व्यक्त केलं. विधेयकाबाबत माहिती दिलेल्या पुस्तिकेतील स्पष्टीकरणावर नीलम गोऱ्हेंनी असमाधान व्यक्त केलंय.

Begging to Be Banned in Maharashtra
Municipal Elections : महापालिका निवडणुकीला मुहूर्त कधीचा? महत्त्वाची तारीख आली समोर, वाचा लेटेस्ट अपडेट

महारोगी शब्द वगळण्यासाठी आलेल्या विधेयकाचा आणि त्याचे शीर्षक यात ताळमेळ नसल्याची प्रतिक्रिया आमदार एकनाथ खडसेंनी दिली. सभागृहातील अनेक सदस्य असमाधानी असतानाही विधेयक मंजूर करण्यात आलं. या संबंधित विधान परिषद सभापतींच्या दालनात शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Begging to Be Banned in Maharashtra
Local Body Election: आधी कुस्ती नंतर दोस्ती; सांगोल्यात जयकुमार गोरे आणि शहाजी बापूंमधील वाद मिटला?

लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?

लाडकी बहीण योजनेबाबत आज विधानसभेत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सरकारला लाडकींना २१०० रुपये कधी देणार? सवाल केला. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देत. 'लाडक्या बहिणींना योग्यवेळी २१०० रुपये देऊ.', असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com