Maharashtra Politics: निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट या मुद्द्यांवर करणार युक्तिवाद?

Maharashtra Politics : सर्वोच्च न्यायालयात उद्या राज्यातील सत्तासंघर्षावरील नियमित सुनावणीसह ठाकरे गटाने दाखल केलेल्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर देखील सुनावणी होणार आहे.
Thackeray group Will argue on these issues
Thackeray group Will argue on these issuessaam tv
Published On: 

Maharashtra Politics: सर्वोच्च न्यायालयात उद्या राज्यातील दोन महत्वाच्या विषयांवर सुनावणी होणार आहे. उद्या सकाळी राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी होणार आहे. तसेच शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातही ठाकरे गटाने याचिका दाखल केलेली आहे. या याचिकेवर देखील उद्या दुपारी सुनावणी होणार आहे

सर्वोच्च न्यायालयात उद्या सकाळी ११ वाजता महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील नियमीत सुनावणीला सुरूवात होणार आहे, तर दुपारी ३:३० वाजता निवडणूक आयोगाच्या शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह देण्याच्या निर्णयाच्या विरोधात सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार आहे. (Latest Marathi News)

Thackeray group Will argue on these issues
Maharashtra Politics: आताची सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड

या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालय हे प्रकरण उच्च न्यायालयात पाठवते? की यावर सुनावणी संपूर्ण करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी युक्तीवाद केला जाणार आहे. दरम्यान याधीच शिंदे गटाने आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय देऊ नये असे कॅव्हेट सर्वोच्च न्यायालयात दाखल केले आहे.

उद्धव ठाकरे गट कोणत्या मुद्द्यांवर करणार युक्तीवाद?

सादिक अली केसनुसार आमदार खासदारांना मिळालेली मत गृहीत धरली आहेत. मात्र, तेव्हा शेड्यूल्ड १० नव्हते.

निवडणूक आयोगाच्या निर्णयात मूळ पक्षाचं महत्त्व गृहित धरण्यात आलेले नाही.

Thackeray group Will argue on these issues
Crime News: महाराष्ट्र हादरला! एकाच घरातील ३ महिलांंची हत्या; धक्कादायक माहिती आली समोर

विधानपरिषद आणि राज्यसभा खासदारांच्या मतांचं काय? त्यांचे पक्षात काहीच योगदान नाही का?

२०१८ च्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणी संदर्भात निवडणूक आयोगाच्या संपूर्ण सुनावणीत आयोगाने काहीच म्हटले नाही.

सर्वोच्च न्यायालय जोपर्यंत पूर्ण निर्णय घेत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com