अमित गवळे, प्रतिनिधि
सातारा: महाबळेश्वर घाटामध्ये आज, सोमवारी (ता. २५) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवाशांनी भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी खोल दरीमध्ये कोसळली. या गाडीमध्ये एकूण आठ व्यक्ती प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, घटनास्थळी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
रेस्क्यू टीम सदस्य सागर दाहिंबेकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. 25) पहाटे 3 च्या सुमारास या अपघाताची माहिती स्थानिक प्रशासनाला आणि मदतकार्य पथकांना मिळाली. माहिती मिळताच 'सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था' आणि 'रेस्क्यू टीम*चे जवान, पोलीस तात्काळ आवश्यक साधनांसह घटनास्थळी रवाना झाले. घाटातील अंधार आणि दुर्गम भागाचा सामना करत पथकाकडून दरीत उतरून प्रवाशांचा शोध घेण्याचे व बचाव कार्य करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त गाडी स्कॉर्पिओ असून तिचा क्रमांक MH 11 DN 2340 असा आहे. या गाडीतील सर्व प्रवासी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी आहेत. गाडीतील प्रवाशांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. महेश अनिल पवार (वय २५ वर्षे, रा. आसगाव, ता. कोरेगाव), आदित्य अशोक साळुंखे (वय २१ वर्षे, रा. आसगाव, ता. कोरेगाव), रितेश राजेंद्र लोखंडे (वय २५ वर्षे, रा. आसगाव, ता. कोरेगाव), सुहास जितेंद्र लोखंडे (वय २० वर्षे, रा. आसगाव, ता. कोरेगाव), अंश समीर चव्हाण (वय १८ वर्षे, रा. आसगाव, ता. कोरेगाव), उत्कर्ष आनंद शिंगटे (वय २१ वर्षे, रा. आसगाव, ता. कोरेगाव), अनिल अभिमन्यू शिंगटे (वय २५ वर्षे, रा. आसगाव, ता. कोरेगाव), नितीन किसन नायकोंडे (वय ३५ वर्षे, रा. आसगाव, ता. कोरेगाव)
हा अपघात नेमका कशामुळे झाला, गाडीचा ताबा सुटला की अन्य काही कारण होते, याची माहिती अजून मिळालेली नातू. तसेच या अपघातात नेमकी किती जीवितहानी झाली आहे किंवा किती जण गंभीर जखमी आहेत, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. या आठ मित्रांची ट्रीप ही अखेरची ठरली असून राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात झालेल्या एका दुर्दैवी अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे 8 मित्र फिरायला गेले असता त्यांचे वाहन दरीत 1500 फूट खाली कोसळले. त्यामुळे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. जिल्हा प्रशासनाने तातडीने मदत व बचावकार्य प्रारंभ केले असून प्रत्येकी 7 जणांची 5 पथके तयार केली आहेत. मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून आतापर्यंत 3 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. लवकरच उर्वरित मृतदेह बाहेर काढले जातील. यात एनडीआरएफची सुद्धा मदत घेतली जात आहे. इतर स्वयंसेवी बचाव पथके सुद्धा मदत करीत आहेत. मृतांपैकी 1 रत्नागिरी जिल्ह्यातील असून उर्वरित 7 हे सातारा जिल्ह्यातील आहेत. रायगड आणि सातारा पोलिस दल सुद्धा समन्वय ठेवून आहेत. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.