पाण्याअभावी रहिवासी हैराण; डोंबिवलीत बिल्डरविरोधात जोरदार आंदोलन

Runwal Garden Dombivli Water Shortage Protest Details: डोंबिवलीतील मानपाडा परिसरातील रुणवाल गार्डन प्रकल्पात तीव्र पाणीटंचाईमुळे संतप्त रहिवाशांनी बिल्डर कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केले.
Residents of Runwal Garden in Dombivli stage a protest outside the builder’s office over severe water shortage issues.
Residents of Runwal Garden in Dombivli stage a protest outside the builder’s office over severe water shortage issues.saam tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

डोंबिवली नजीक मानपाडा परिसरातील रुणवाल गार्डन या प्रकल्पात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने संतप्त नागरिकांनी रविवारी बिल्डरच्या कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली. लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न सोडवावा, अन्यथा न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. रुणवाल रेसिडेन्सी कंपनीकडून मानपाडा येथे रुणवाल गार्डन हा मोठा निवासी प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पात एकूण सहा फेजचे नियोजन असून सध्या तीन फेजमध्ये रहिवासी वास्तव्यास आहेत. या तीन फेजमध्ये सुमारे साडेचार हजार कुटुंबे राहत असून जवळपास १५ हजारांची वस्ती येथे आहे.

Residents of Runwal Garden in Dombivli stage a protest outside the builder’s office over severe water shortage issues.
गोरेगाव ड्रग रॅकेटचा पर्दाफाश! सत्तूच्या ड्रग साम्राज्यावर पालिकेचा बुलडोझर|VIDEO

या परिसराला एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. मात्र पाणी व्यवस्थापनाचे काम बिल्डरकडील कर्मचाऱ्यांमार्फत केले जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. अनेक सोसायट्यांचे व्यवस्थापन रहिवाशांकडे हस्तांतरित होऊन तीन वर्षे उलटूनही स्वतंत्र पाण्याचे मीटर देण्यात आले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे बिल्डरकडून प्रकल्पाच्या इतर कामांसाठीही हेच पाणी वापरले जात असून रहिवाशांना व्यावसायिक दराने पाणीपुरवठा करून आर्थिक फायदा घेतला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Residents of Runwal Garden in Dombivli stage a protest outside the builder’s office over severe water shortage issues.
Virar- Alibaug Corridor: विरार ते अलिबाग प्रवास सुसाट, १४ पदरी कॉरिडोर ६ महामार्गांना जोडणार; भिवंडी अन् कल्याणमधील ट्रॅफिकचा प्रश्न सुटणार

विशेषतः ईडब्ल्यूएस इमारतींना मागील काही दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही नागरिकांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी संतप्त रहिवाशांनी रुणवाल विकासकाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी नागरिकांनी बिल्डरविरोधात घोषणाबाजी करत पाण्याच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली. तसेच पाण्याच्या समस्येवर उपाय करण्याऐवजी सोसायट्यांमध्ये वाद निर्माण करण्याचे काम बिल्डरकडून होत असल्याचा आरोपही रहिवाशांनी केला.

Residents of Runwal Garden in Dombivli stage a protest outside the builder’s office over severe water shortage issues.
26/11 Mumbai Terror Attacks | Ramesh Bais आणि CM Shinde, Fadnavis यांच्याकडून पुष्प चक्र अर्पण

बिल्डरच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी चर्चा करत पाणी समस्येमागील कारणे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र या उत्तरांवर नागरिक समाधान व्यक्त करत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे येत्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com