Madhukar Pichad
Madhukar Pichad Died Saam

Madhukar Pichad Died: भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन, ब्रेन स्ट्रोक आजाराशी देत होते झुंज

Madhukar Pichad Died : माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती.
Published on

ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ब्रेन स्ट्रोक आल्याने दोन महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. पिचडांचे कार्यकर्ते हॉस्पिटलच्या बाहेर जमण्यास सुरुवात झालीय. प्रकृती सुधारत नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय.

मधुकर पिचड यांच्या निधनाच्या वृत्ताला वैभव पिचड यांनी दुजोरा दिलाय. मधुकर पिचड यांचे साडेसहा वाजता नाशिक येथे निधन झाल. त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम त्यांच्या मूळ गावी राजुर येथे दुपारी चार वाजता होणार आहे. अकोले कॉलेज आणि पक्ष कार्यालयात त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी ठेवले जाईल. सकाळी दहा वाजता मुळगाव देवठाण येथे जाणार आहे. मधुकरराव पिचड महाविद्यालयात नागरिकांना अंतदर्शनासाठी पिचड यांचे पार्थिव ठेवले जाईल. मग दुपारनंतर अंत्यविधीची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती वैभव पिचड यांनी दिलीय.

Madhukar Pichad
Madhukar Pichad Death : शिक्षकाचा मुलगा ते माजी आदिवासी कल्याण मंत्री; कसा होता मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास?

ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना १५ ऑक्टोबर रोजी राजूर येथील राहत्या घरी असताना ब्रेनस्ट्रोकचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना नाशिकच्या ९ पल्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान मधुकर पिचड यांच्या जाण्याने चिरंजीव वैभव पिचड यांच्यासह कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात बी. ए. एल. एल. बीचे शिक्षण घेतले होते. तिथूनच विद्यार्थी राजकारणाला सुरुवात केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com