EVM Controversy: रवींद्र वायकरांच्या मेव्हण्याकडून EVM अनलॉक? वायकरांचा विजय वादात

Loksabha Election EVM Controversy: मुंबईतल्या उत्तर पश्चिम मतदारसंघातला शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा विजय पुन्हा वादात सापडलाय. मतमोजणीत वायकर यांच्या मेव्हण्याच्या मोबाईलवर ईव्हीएमचा ओटीपी आल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून मतदान केंद्रावरील डेटा ऑपरेटर आणि वायकरांच्य मेव्हण्याची चौकशी होणार आहे. नेमका काय वाद झालाय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.
EVM Controversy: रवींद्र वायकरांच्या मेव्हण्याकडून EVM अनलॉक? वायकरांचा विजय वादात
Loksabha Election EVM ControversySaam Tv
Published On

मुंबईतल्या उत्तर पश्चिम मतदारसंघातला शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा विजय पुन्हा वादात सापडलाय. मतमोजणीत वायकर यांच्या मेव्हण्याच्या मोबाईलवर ईव्हीएमचा ओटीपी आल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून मतदान केंद्रावरील डेटा ऑपरेटर आणि वायकरांच्य मेव्हण्याची चौकशी होणार आहे. नेमका काय वाद झालाय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन झालं. मात्र उत्तर-पश्चिम मुंबईच्या निकालाचा वाद काही शमायला तयार नाही. पोस्टल मतदानाच्या फेरमतमोजणीच्या वादानंतर आता थेट ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप करण्यात आलाय. त्य़ामुळे रवींद्र वायकरांचा विजय वादात सापडलाय.

4 जूनला मतमोजणीदरम्यान नेस्को सेंटरमधील डेटा ऑपरेटर दिनेश गुरव यांनी रवींद्र वायकर यांचे मेव्हणे मंगेश पंडीलकर यांना मतमोजणी केंद्रात आपला फोन वापरायला दिला. यानंतर याच मोबाईलवर आलेल्या ओटीपीनं ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय.

या प्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात आला असून पोलिसांनी या दोघांची चौकशी सुरू केलीय. तर दिनेश गुरवला ब़डतर्फ करण्यात आलंय. या मतदान केंद्रावरील सीसीटीव्ह फूटेजची मागणी ठाकरे गटानं केली. मात्र त्यांची ही मागणी फेटाळण्यात आली. त्यामुळे आता ठाकरे गटानं कोर्टात जाण्याची तयारी केलीय. तर ठाकरे गट रडीचा डाव खेळत असल्याचा टोला विजयी उमेदवार रवींद्र वायकरांनी लगावलाय.

तर निवडणूक आयोगानं ईव्हीएम अनलॉक केल्याचा आरोप फेटाळून लावलाय. परवानगी नसताना दिनेश गुरव या डेटा ऑपरेटरनं मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल वापरल्यामुळे बडतर्फीची कारवाई करण्यात आल्याचं उत्तर पश्चिमच्या निवृडणूक अधिका-यांनी सांगितलं. तसंच ईव्हीएमसाठी कोणताही ओटीपी नसतो. त्यामुळे ईव्हीएम हॅक करता येत नसल्याचं निवडणूक अधिका-यांनी स्पष्ट केलं.

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेत वायकरांनी पोस्ट मतांच्या आधारावर केवळ 48 मतांनी अमोल कीर्तिकरांवर विजय मिळवला. अवैध ठरलेल्या पोस्टल मतांवरूनही वाद निर्माण झाला होता. आता आयोगानंच मोबाईलवरून घडलेल्या प्रकाराची पोलिसांत तक्रार दिल्यामुळे आता पुन्हा वायकरांचा हा विजय वादात सापडलाय.

EVM Controversy: रवींद्र वायकरांच्या मेव्हण्याकडून EVM अनलॉक? वायकरांचा विजय वादात
Shivsena MLA Disqualification: ऐन निवडणुकीत रवींद्र वायकर शिंदे गटात गेले, ठाकरे गटाने पाठवली नोटीस

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com