Shivsena MLA Disqualification: ऐन निवडणुकीत रवींद्र वायकर शिंदे गटात गेले, ठाकरे गटाने पाठवली नोटीस

Ravindra Waikar Recived Notice From Shiv Sena Uddhav Thackeray Group: ऐन निवडणूकीत रवींद्र वायकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने त्यांच्यावर आमदार अपात्रतेच्या कारवाईची मागणी करत आहे.
Maharashtra Lok Sabha Election 2024 Shiv Sena Uddhav Thackeray Group Send Disqualification Notice To Ravindra Waikar
Maharashtra Lok Sabha Election 2024 Shiv Sena Uddhav Thackeray Group Send Disqualification Notice To Ravindra WaikarYandex

सागर आव्हाड साम टिव्ही, पुणे

ऐन निवडणूकीत रवींद्र वायकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवसेना शिवसेना उद्धव ठाकरे गटाने त्यांच्यावर आमदार अपात्रतेच्या कारवाईची मागणी केली आहे. ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्यामार्फत रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. अपात्रतेची कारवाई करण्यात यावी म्हणून नोटीस पाठवल्याची माहिती मिळत आहे. रवींद्र वायकर यांचं वागणं विश्वसनीय नसल्याचं सरोदेंनी म्हटलं आहे.

शिवसेना फुटीनंतरही उद्धव ठाकरे (Shiv Sena Uddhav Thackeray Group) यांच्याबरोबर राहणारे वायकर ईडीच्या भीतीने शिंदे गटात गेले आहेत. त्यांना शिंदे गटाकडून मुंबईत उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे उद्धव ठाकरे आक्रमक झाली आहे. दोन दिवसांनंतर विधानसभा अध्यक्षांना नोटीस पाठवणार असल्याची माहिती मिळतेय. निवडणुकांनंतर त्यांच्यावर आमदारकीच्या अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, यासाठी नोटीस पाठविण्यात आली आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024 Shiv Sena Uddhav Thackeray Group Send Disqualification Notice To Ravindra Waikar
Ravindra Waikar : ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का; आमदार रवींद्र वायकर शिंदे गटात प्रवेश करणार?

नोव्हेंबर २०२३ नंतर पक्षफुट झाली. त्यानंतर रवींद्र वायकर ठाकरेंसोबत राहणार असं त्यांनी सांगितलं होतं. परंतु त्यानंतर त्यांना ईडीच्या दबावामुळे शिंदे गटात प्रवेश केला आहे. अचानक त्यांनी पक्षांतर केलं (Thackeray Group Notice To Ravindra Waikar) आहे. ही बेकायदेशीरता आहे. त्यामुळे त्यांच्यावर आमदार अपात्रतेची कारवाई करण्यात येणार असल्याची नोटीस पाठविण्यात आली आहे, असं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी सांगितलं आहे. ही नोटीस त्यांच्यावर कारवाई का करू नये, असं विचारणा करणारी असल्याचं सरोदेंनी सांगितलं आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024 Shiv Sena Uddhav Thackeray Group Send Disqualification Notice To Ravindra Waikar
Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकरांचा मास्टर प्लान, पुणे शहराचं रुपडंच पालटणार; मतदारांना कोणती आश्वासने दिली?

रवींद्र वायकर यांनी शिंदेगटात प्रवेश केल्यानंतर त्यांना उत्तर पश्चिममधून उमेदवारी जाहीर झाली आहे. ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर विरूद्ध शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांच्यात लढत होत (Lok Sabha 2024) आहे. त्यांनी अचानक उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांचं हे वर्तन विश्वसनीय नसल्याचा ठपका कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी ठेवला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com