Ravindra Waikar : ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का; आमदार रवींद्र वायकर शिंदे गटात प्रवेश करणार?

MLA Ravindra Waikar : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर आज सायंकाळी आठच्या दरम्यान वर्षा निवासस्थानी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
Ravindra Waikar
Ravindra Waikar Saam Digital

Ravindra Waikar

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर मागील अनेक दिवसांपासून एकनाथ शिदें गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. दरम्यान आज सायंकाळी आठच्या दरम्यान ते वर्षा निवासस्थानी दाखल होऊन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.

रवींद्र वायकर (Ravindra Waikar) मागील आनेक दिवसांपासून तपास यंत्रणांच्या रडारवर वायकर होते. जोगेश्वरी पश्चिम उपनगर येथील ते आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाने एक मोठी ताकद एकनाथ शिंदेंच्या सोबतीला जोडली जाईल. गजानन किर्तीकर हे स्थानिक खासदार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने वायकरांसोबत काही स्थानिक नगरसेवक ही येण्याची शक्यता आहे.

ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काल पश्चिम उपनगराच्या दौऱ्यावर असताना जोगेश्वरीच्या शिवसेना शाखेत गेले होते. यावेळी ठाकरे यांचे स्वागत करताना वायकर यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. मात्र आता वायकरांचा शिंदे यांच्या शिवसेनेते तातडीने प्रवेश करण्याचा निर्णय झाला असल्याचे समजते.

Ravindra Waikar
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ठाकरे गटात प्रवशे करणार; या मतदारसंघातून उमेदवारी निश्चित?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यावरती आहेत. हा दौरा आटोपून मुख्यमंत्री शिंदे आज सायंकाळी मुंबईत दाखल होतील. मुंबईत आल्यानंतर शिंदे यांच्या उपस्थितीत वायकरांचा पक्षप्रवेश होईल, असे सांगण्यात येत आहे. यामुळे ठाकरेंना हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

Ravindra Waikar
Shirdi Politics: शिवसेनेकडे असलेल्या जागेवर भाजपचा डोळा; विखे पाटलांच्या विधानामुळे खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com