EVM Controversy: मतमोजणी केंद्रावर मोबाईलचा वापर झाला होता; EVM वादावर निवडणूक अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

EVM Controversy: अमोल कीर्तीकर आणि रविंद्र वायकर यांच्या मतमोजणीवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यावरून निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलंय.
EVM Controversy: मतमोजणी केंद्रावर मोबाईलचा वापर झाला होता; EVM वादावर निवडणूक अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण
EVM Controversy
Published On

ईव्हीएम हे ओटीपीने ओपन होत नसल्याचा खुलासा निवडणूक अधिकाऱ्यांनी उत्तर-पश्चिम मतदारसंघाच्या मतमोजणी वादावर स्पष्टीकरण दिलं. उत्तर-पश्चिम मतदारसंघाच्या मतमोजणीच्या केंद्राजवळ अज्ञात व्यक्तीने मोबाईल वापरला होता.पण ओटीपीने ईव्हीएम उघडता येत नसल्याची माहिती निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिलीय. आम्ही डाटा अपलोड करण्यास मोबाईल वापरण्याची परवानगी दिली होती. परंतु संबंधित व्यक्तीपर्यंत मोबाईल कसा गेला, याप्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केलाय. त्याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत. तसेच मतमोजणी केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज न्यायालयाच्या परवानगी शिवाय कोणालाच दिले जाणार नाही, असेही निवडणूक आयोगाने सांगितलंय.

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ कमालीचा चर्चेत आलाय. मतमोजणीवेळी ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल वायकरांच्या नातेवाईकाकडे होता, त्यावरून राजकीय वादळ उठलंय.शिवसेनेचे नवनियुक्त खासदार रविंद्र वायकर यांच्या मेहुण्याने ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल वापरल्याच्या आरोपांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यावरून निवडणूक आयोगाने आज मोठा खुलासा केलाय. ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी कोणताही ओटीपी लागत नसल्याचं,असे निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. तसेच ईव्हीएम आणि पंडीलकरांचा संबंध नाही, असं निवडणूक अधिकारी सूर्यवंशी म्हणाल्या.

दरम्यान उत्तर पश्चिम मतदारसंघात झालेल्या मतमोजणीच्या गोंधळावरून काँग्रेस खासदार राहुल गांधींना ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तर ईव्हीएम हॅक होऊ शकतं असा दावा एलन मस्कने केला होता. त्यावरुनही निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी स्पष्टीकरण दिलंय.ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी कोणत्याही ओटीपीची आवश्यकता नाही.

तसेच ईव्हीएम यंत्र कशाशीही जोडले जात नाही,असेही निवडणूक आयोगाच्यावतीने रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी यांनी सांगितले. दरम्यान आज आलेल्या बातम्यांवरून काही लोकांनी ट्विट केले. चुकीची बातमी प्रसिद्ध केली. ईव्हीएम ही स्वतंत्र प्रणाली आहे. आम्ही चुकीची बातमी दिल्यावरून वृत्तपत्राला नोटीस पाठविली आहे. आयपीसी ४९९ अंतर्गत मानहानीचा गुन्हाही दाखल करण्यात आलाय. असं अधिकारी म्हणाल्यात.

चुकीची माहिती देणाऱ्या पत्रकारांना आपण समजविण्याचा प्रयत्नही केला होता. त्यांना आयपीसी ५०५ आणि ४९९ नुसार नोटीस पाठविली जाणार आहे. आयोगाचा अधिकारी गौरव यांना जो मोबाईल ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती तो त्यांचा स्वत:चा मोबाईल होता.पोलीस तपासानंतर आम्हीही अंतर्गत तपास करणार की नाही ते ठरविणार आहोत, असे त्या म्हणाल्या.

EVM Controversy: मतमोजणी केंद्रावर मोबाईलचा वापर झाला होता; EVM वादावर निवडणूक अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण
Sangli Politics: 'नवे निर्णय घ्यावे लागतील'; जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात येऊन विशाल पाटील, विश्वजित कदम यांचे थेट आव्हान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com