Sangli Politics: 'नवे निर्णय घ्यावे लागतील'; जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात येऊन विशाल पाटील, विश्वजित कदम यांचे थेट आव्हान

Sangli Loksabha Constituency News: सांगली लोकसभेचे नूतन खासदार विशाल पाटील यांच्या विजया निमित्ताने कसबे डिग्रज येथे सत्कार समारंभ पार पडला. यावेळी बोलताना विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी जयंत पाटील यांना थेट इशारा दिला.
Sangli Politics: 'नवे निर्णय घ्यावे लागतील'; जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात येऊन विशाल पाटील, विश्वजित कदम यांचे थेट आव्हान
Sangli Loksabha News: Saamtv

सांगली, ता. १६ जून २०२४

'यापुढे इस्लामपूर-वाळवा मतदारसंघावर देखील आपलं विशेष लक्ष राहील,आणि या मतदारसंघात आता नवीन निर्णय घ्यावे लागतील' अशा शब्दात सांगलीचे नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील आणि काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या मतदारसंघातल्या कसबे डिग्रज येथे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.

सांगली लोकसभेचे नूतन खासदार विशाल पाटील यांच्या विजया निमित्ताने कसबे डिग्रज येथे सत्कार समारंभ पार पडला. काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे सांगली लोकसभा मतदार संघात नसणारे कसबे डिग्रज हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील गाव आहे.

काय म्हणाले विशाल पाटील?

"विश्वजीत कदम आघाडीत असल्यामुळे काही बोलू शकत नाही, पण मी अपक्ष खासदार असल्याने काहीही करू शकतो,आपण दिल्लीत काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. पण अपक्ष खासदार म्हणून या इस्लामपूर मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातल्या गावांचा सत्कार व्हायचा असताना, तुमच्या गावात येऊन सत्कार स्विकारतोय, यावरुन तुम्ही ओळखले पाहिजे आहे. पुढची दिशा काय असणार आहे," असं सूचक वक्तव्य विशाल पाटील यांनी केले.

Sangli Politics: 'नवे निर्णय घ्यावे लागतील'; जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात येऊन विशाल पाटील, विश्वजित कदम यांचे थेट आव्हान
Accident News: चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात! सुसाट कार ४-५ वेळा उलटली; ४ जण गंभीर जखमी

विश्वजित कदम काय म्हणाले?

"आपण विशाल पाटील आणि जयश्रीताई पाटील खंबीरपणे कसबे डिग्रजमधल्या जनतेच्या पाठीशी आहोत. कसबे डीग्रजवर जेवढे लक्ष आमचं नव्हते, त्याच्या दहा पटीने येणाऱ्या काळात लक्ष देऊ. त्यामुळे पत्रकारांना काय लिहायचे, ते लिहा आम्हाला कशाची परवा नाही, कारण चांगली माणसं आमच्या सोबत आहेत," असे विश्वजित कदम म्हणाले.

Sangli Politics: 'नवे निर्णय घ्यावे लागतील'; जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात येऊन विशाल पाटील, विश्वजित कदम यांचे थेट आव्हान
OBC Reservtion: 'जो सगेसोयरेचा जीआर काढेल, त्यांचे आमदार "चुन चुन के गिरायेगें', ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com