जेलमधून जन्मठेपेचा कैदी फरार; घटनेची माहिती देण्यासही उशीर, कारागृह प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Dhule Jail Life Convict Escape News: धुळे कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला भिकन पिंजारी हा कैदी शेतीकाम करत असताना फरार झाला. घटनेची माहिती पोलिसांना उशिरा देण्यात आल्याने कारागृह प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पोलिसांनी फरार कैद्याचा शोध युद्धपातळीवर सुरू केला आहे.
Life convict Bhikan Pinjari escaped from Dhule Central Jail while working in the prison farm area, triggering a major police search operation
Life convict Bhikan Pinjari escaped from Dhule Central Jail while working in the prison farm area, triggering a major police search operationSaam Tv
Published On

भूषण अहिरे, साम टीव्ही

धुळे कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी फरार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे, पिंपळनेर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या अपहरण आणि खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला 54 वर्षीय कैदी भिकन पिंजारी हा धुळे कारागृहाच्या बावडी बाग परिसरातून शेतीकाम करत असताना फरार झाला आहे.

Life convict Bhikan Pinjari escaped from Dhule Central Jail while working in the prison farm area, triggering a major police search operation
Crime: मित्राला घरी आणल्यामुळे वाद, तरुणाने सख्ख्या भावाची चाकूने वार करत केली हत्या

याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात कारागृह शिपायाच्या फिर्यादीनुसार कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, या संपूर्ण घटनेत जेल प्रशासनाचा मोठा निष्काळजीपणा उघडकीस आला आहे. कैदी सकाळी पळालेला असतानाही कारागृह प्रशासनाने पोलिसांना उशिरा माहिती दिल्याने कारागृह प्रशासनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जर ही माहिती तात्काळ दिली असती तर तातडीने नाकाबंदी करून या गुन्हेगाराला पकडणे शक्य झाले असते, असे स्पष्ट करत पोलिसांनी आता या फरार कैद्याचा शोध युद्धपातळीवर सुरू केला आहे.

Life convict Bhikan Pinjari escaped from Dhule Central Jail while working in the prison farm area, triggering a major police search operation
पुण्याच्या चारही बाजूंनी सुसाट धावणार गाड्या, महत्वाच्या ५ रस्त्यांची घोषणा; बजेट ५० हजार कोटी

मुंबई आग्रा महामार्गावर चाकूचा धाक दाखवून लुट

मुंबई आग्रा महामार्गावर चाकूचा धाक दाखवून लुट केल्याची घटना मुंबई आग्रा महामार्गावरील शिरपूर टोलवे ते सावळदे गावात दरम्यान घडली आहे, मध्यप्रदेश राज्यातून मुंबईकडे लसून घेऊन जाणाऱ्या पिकअपची लुट करण्यात आली आहे, महामार्गावर हात दाखवून लसुनने भरलेला पिकअप थांबवून ही लुट करण्यात आली आहे,

यासंदर्भात पोलीस प्रशासनाची भूमिका आता महत्त्वपूर्ण असणारा असून शिरपूर पोलीस या संदर्भाचा सखोल तपास करीत आहेत, पिकअप चालकाला चाकुचा धाक दाखवत पिक अप वाहन शेतात घेऊन जात मारहाण करत ही लुट करण्यात आली आहे. त्याचबरोबर पिकअप वाहनातील तीन टन लसून सह चालक जयपाल थोरातच्या कानातील सोन्याच्या कड्या देखील या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com