Satara News: काँग्रेस नेत्याच्या नातवावर बिबट्याचा हल्ला; प्रचारावरून घरी परतताना घडली घटना
साताऱ्यात काँग्रेस नेत्याच्या नातवावर बिबट्याचा हल्ला
निवडणूक प्रचारावरून परतताना घटना घडली
अधिराज पाटील यांच्या पायाला दुखापत
साताऱ्यामधील ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी सहकार मंत्री दिवंगत विलासराव पाटील उंडाळकर यांच्या नातवावर बिबट्याचा हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्ल्यात अधिराज पाटील यांच्या पायाला दुखापत झाली आहे. दरम्यान मानव-बिबट संघर्ष वारंवार घडत असल्याने चिंतेची परिस्थिती निर्माण झालीय. आता नेत्याच्या नातवावरच हल्ला झाल्यानं शासन अॅक्शन मोडवर येईल अशा आशा आहे.
दरम्यान अधिराज पाटील यांचे वडील उदयसिंह पाटील उंडाळकर येळगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत. उदयसिंह पाटील उंडाळकर हे अजित पवार गटाचे नेते आहेत. दरम्यान अधिराज पाटील हे वडील उदयसिंह पाटील उंडाळकर यांचा निवडणूक प्रचार करण्यासाठी गेले होते. प्रचार करून घरी परताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला चढवला. कराड तालुक्यातील उंडाळे शेवाळवाडी मार्गावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
अधिराज पाटील यांच्यासोबत असणारे दुचाकी चालक धनाजी पाटील हेही थोडक्यात बचावले. अधिराज पाटील यांच्यावर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारानंतर अधिराज पाटील यांची प्रकृती स्थिर आहे. बिबट्याच्या सततच्या नागरिकांवरच्या हल्ल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून होतेय. दरम्यान मानव-बिबट संघर्ष वारंवार होतोय. बिबटे त्यांचा अधिवास सोडून गाव, शहरांत येऊ लागले आहेत. यामुळे मानव-बिबट यांच्यातील संघर्ष वाढलाय. त्यामुळे संघर्षाला आळा घालण्यासाठी बिबट्यांची नसबंदी करण्याची मागणी होतेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

