Laxman Hake : ऐन विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके यांच्या कारवर पुन्हा हल्ला, परिसरात मोठा गोंधळ, VIDEO

Laxman Hake Latest News : लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे.
ऐन विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके यांच्या कारवर पुन्हा हल्ला, परिसरात मोठा गोंधळ
Laxman Hake Saam tv
Published On

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही प्रतिनिधी

नांदेड : नांदेडमधून मोठी बातमी हाती आली आहे. नांदेडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. नांदेडच्या कंधार तालुक्यातील बाचोटीमध्ये लक्ष्मण यांच्या कारवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नांदेडच्या कंधार तालुक्यातील बाचोटी येथे लक्ष्मण हाके यांच्या सभेत गोंधळ झाला आहे. कंधार तालुक्यातील बाचोटी येथे दोन गट आमने-सामने आल्याने प्रचंड गोंधळ झाला. लोहा कंधार मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार चंद्रशेखर पाटील यांच्या प्रचारार्थ लक्ष्मण हाके यांची सभा होती. या सभेदरम्यान दोन गट आमनेसामने आल्यानंतर गोंधळा झाला. यावेळी एका गटाने लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला केला. या आधी त्यांच्यावर पुण्यात हल्ला झाल्याची घटना घडली होती.

ऐन विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके यांच्या कारवर पुन्हा हल्ला, परिसरात मोठा गोंधळ
Laxman Hake viral video : लक्ष्मण हाके मद्यप्राशन करत असल्याचा आरोप; पुण्यात मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक, नेमकं काय घडलं?
ऐन विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके यांच्या कारवर पुन्हा हल्ला, परिसरात मोठा गोंधळ
Manoj Jarange Patil : विधानसभा निवडणुकीत मराठा समाज कोणाच्या पाठिशी असणार? ऐन निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांचं मोठं वक्तव्य

या घटनेनंतर लक्ष्मण हाके म्हणाले, आम्ही लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात एका उमेदवाराच्या प्रचारासाठी आलो होतो. बाचोटीतून आमच्या गाड्यांचा ताफा चालला होता. त्यावेळी तोंडाला पांढरा गमछा असलेल्या १०० ते १५० तरुणांच्या गटाने लाठ्याकाठ्या घेऊन आमच्या कारवर हल्ला केला. त्यांनी भ्याड हल्ला केला. माझ्यासोबत लोहा कंधारचे एक उमेदवार आहेत. आम्ही प्रचारासाठी जवळच्या गावात सभा घेणार होतो. हे तरुण कारच्या बोनेटवर चढून घोषणाबाजी केली. त्यांनी जरांगे पाटील यांच्या नावाच्या घोषणा केल्या'.

ऐन विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके यांच्या कारवर पुन्हा हल्ला, परिसरात मोठा गोंधळ
Manoj Jarange Patil : मतदान करा पण पाडापाडी कराच; जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन

'माझ्या कारच्या काचा फोडल्या. त्यांनी तोंड बांधून हल्ला केला. खरंतर त्यांनी आमनेसामने हल्ला करायला पाहिजे होता. आम्ही या महाराष्ट्राचे नागरिक आहोत ना? आम्ही ओबीसी समाजाची बाजू मांडायची नाही का? ओबीसी समाजाची माणसे निवडणुकीला उभी राहिलेली त्यांना आवडत नाही. या भ्याड लोकांना अटक केली नाही, तर उद्या आम्ही सकाळी पोलील स्टेशनवर मोर्चा काढणार आहोत, असे ते पुढे म्हणाले.

दरम्यान, या घटनेनंतर गुन्हा दाखल झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या संपूर्ण प्रकारानंतर पोलीस काय कारवाई करतात, हे पाहावे लागेल.

ऐन विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके यांच्या कारवर पुन्हा हल्ला, परिसरात मोठा गोंधळ
Maratha Aarakshan : एकनाथ शिंदेच मराठ्यांना आरक्षण देणार; जरांगेंकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, फडणवीसांना आव्हान!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com