Manoj Jarange Patil : मतदान करा पण पाडापाडी कराच; जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन

Beed News : विधानसभा निवडणुकीतील भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलीय. त्यानंतर आता ही भूमिका स्पष्ट केल्यानंतर आज पासून जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातून दौऱ्याला सुरुवात केली आहे
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSaam tv
Published On

बीड : विधानसभा निवडणुकीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले नाही. त्यांनीच पचका करून ठेवला आहे. ज्यांनी अर्ज भरले त्यांना सांगितले होते. अपक्ष अर्ज भरून मते खायचे काम करू नका. त्यामुळे ज्यांना पाडायचे आहे ते पडणार नाहीत. आता मतदान करा, पण पाडापाडी करायची आहे; असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे. 

विधानसभा निवडणुकीतील भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलीय. त्यानंतर आता ही भूमिका स्पष्ट केल्यानंतर आज पासून जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी बीड जिल्ह्यातून दौऱ्याला सुरुवात केली आहे. तर यावेळी त्यांनी (Beed) पुन्हा एकदा मराठा बांधवांना आवाहन केले आहे. मला समाजाचे भविष्य बघायचं आहे. मूर्ख होऊन चालणार नाही. दीडशे जणांना उभे केले असते. मात्र त्यांच्यासाठी ६ कोटी समाजाचे वाटोळे करू शकत नाही. तो क्षणिक आनंद आहे. 

Manoj Jarange Patil
Ulhasnagar News : रेकोर्डवरील गुन्हेगाराला शस्त्रांसह केले जेरबंद; उल्हासनगर गुन्हे शाखेची मोठी कारवाई

राजकारणासाठी आरक्षण जायला नको 

मला समाजाला आरक्षण देऊन आयुष्यभराचा आनंद द्यायचा आहे. मागे सरकलो म्हणून काय वाईट झाले. मी मराठा समाजाचे काम करतो, दीडशे जणांचे काम करत नाही. त्यांच्यासाठी करोडो मराठ्यांना अडचणीत आणणार नाही. ते जर पडले असते तर समाजाला हिणले गेले असते, टोमणे मिळाले असते. त्यामुळे माझी समाजाची मान खाली जाईल म्हणून मी माघार घेतली. समाजासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे. या राजकारणासाठी आरक्षण जायला नको म्हणून ही भूमिका घेतल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. 

Manoj Jarange Patil
Chalisgaon News : परतीच्या पावसाने मक्याचे नुकसान; शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल


आजपासून पुन्हा एकदा आरक्षणाचा लढा सुरू झाला आहे. आम्हाला कुणाच्याही प्रचाराला जायची गरज नाही. आता पुन्हा लढा उभा करायचा आणि आरक्षण मिळवायचं. राजकारणासाठी असतो तर उमेदवार उभे केले असते. माझा समाज माझ्यासाठी मोठा आहे. या समाजाला मी मायबाप मानल आहे. समाज अडचणीत येऊ नये, म्हणून मी योग्य पाऊल उचलत आहे. कुणाच्याही प्रचाराला आणि सभेलाही जाऊ नका, माझा निरोप आला तर बघू आणि नाही आला तर तुमच्या हिताचा निवडून येईल. तिकडेच मतदान करायचं पण शक्यतो पाडापाडी कराच जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केले.  

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com