Maratha Aarakshan : एकनाथ शिंदेच मराठ्यांना आरक्षण देणार; जरांगेंकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, फडणवीसांना आव्हान!

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरुन राज्यातील वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा कळीचा ठरण्याची शक्यता आहे.
Manoj Jarange  Maratha Aarakshan
Manoj Jarange Maratha AarakshanSaam TV
Published On

Manoj Jarange Patil Criticizes Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा गाजण्याची चिन्हे आहेत. आचारसंहिता लागण्याआधी मराठ्यांना आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. पण राज्य सरकारकडून तसा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे मनोज जरांगे यांनी रणशिंग फुंकले आहे. २० तारखेला ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

आज पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. इच्छूक उमेदवारांचे अर्ज आले आहेत. २० तारखेला लढायचं की पाढायचं हे ठरवणार असल्याचे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलेय. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केले तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. दुसरीकडे महायुतीच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांना आरक्षण देणार असल्याचं सांगितलेय.

एकनाथ शिंदे धाडसी माणूस -

मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात, तर फक्त एकनाथ शिंदेंच देऊ शकतात. तो धाडसी माणूस आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. एकनाथ शिंदे बोलत नाही, बोलला तर पूर्ण करतो. एकनाथ शिंदे कुणालाही अंगावर घेणार, पण आरक्षण देणार. आजही मराठा समाजात एकनाथ शिंदेंच्या शब्दाला किंमत आहे. तुम्हाला कोण काम करु देत नाही, हे माहित नाही. पण या लफड्यात माझ्या मराठ्यांचा वाटोळं झालं, असे जरांगे म्हणाले.

फडणवीस यांना आव्हान -

फडणवीस यांनी राज्यात केलेली प्लॅनिंग पूर्ण फेल करणार आहे. त्यांनी केंद्राला दिलेली प्लॅनिंग यशस्वी होऊ देणार नाही. आम्हाला वाटत होतं शिंदे साहेब आरक्षण देतील पण आम्हाला आरक्षण मिळू शकलं नाही.त्यांनी धोका केला असं म्हणू शकत नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. मला वेळ द्या , मला मोठ्या डाकूला खेटायचं आहे, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

Manoj Jarange  Maratha Aarakshan
Maratha Aarakshan : जे बोलतो ते करतो, मराठ्यांना आरक्षण देणारच - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे काय म्हणाले ?

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आम्ही शब्द दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं. 10 टक्के आरक्षण आम्ही दिलं, ते रद्द करण्यासाठी कोण कोर्टात गेलं? मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हतं. आता ते मिळत आहेत. मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी लढत आहेत.पण त्यांनी हा देखील विचार करावा, की आम्ही काय दिलं. आम्ही सारथी दिलं,महामंडळ दिलं, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com