विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. शरद पवारांनी अजित पवारांच्या पक्षाच्या ओबीसी नेत्यांच्या विरोधात मराठा कार्ड खेळत अजित पवारांच्या नेत्यांची कोंडी केली आहे. मात्र हे कोणते नेते आहेत? त्याचसोबत ते कोणत्या भागातले आहेत? स्पष्ठ होईल. त्यातच दादांची कोंडी साहेब करणार का? हे तुम्हाला पुढील मुद्यांवरन स्पष्ठ होईल.
पवारांचा मराठा पॅटर्न
येवल्यात छगन भुजबळ यांच्याविरोधात माणिकराव शिंदे या मराठा समाजाच्या नेत्याला पवारांनी संधी दिली आहे.त्याचसोबत परळीत धनंजय मुंडे यांच्याविरोधात राजेसाहेब देशमुख या मराठा उमेदवाराला पवारांची उमेदवारी जाहिर केली आहे.
तर, माजलगावमधून प्रकाश सोळंके यांच्याविरुद्ध मोहन जगताप या मराठा समाजाच्या नेत्याला पवारांकडून संधी देण्यात आली आहे. इंदापूर येथून दत्ता भरणे यांच्याविरोधात मातब्बर मराठा नेते हर्षवर्धन पाटील हे पवारांच्या पक्षाकडून रिंगणात येणार हे ठरले.
सध्या येवल्यात 1 लाख 28 हजार मतं ही मराठा समाजाची आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भुजबळांविरोधात मराठा उमेदवार देऊन भुजबळांचा पराभव करण्याचा चंगच जरांगेंनी बांधलाय. त्यापार्श्वभुमीवर पवारांनी थेट मराठा उमेदवार रिंगणात उतरवला आहे.
मात्र हे समीकरण फक्त येवलाच नाही तर माजलगाव,परळी, इंदापूरमध्येही पहायला मिळाले आहे. त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा समीकरण पवारांना फायद्याचं ठरण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
लोकसभा निवडणूकीत ओबीसी विरुद्ध मराठा हा पॅटर्न मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही मतदारसंघात यशस्वी ठरला होता. मात्र आता पुन्हा पवारांनी मराठा कार्ड खेळत दादांच्या प्रमुख नेत्यांची कोंडी केलीय. त्यामुळे दादांचे नेते जातीय समीकरण जुळवत पवारांनी केलेली कोंडी फोडणार की पवारांचा डाव यशस्वी होणार? याकडे सर्वांच लक्ष आहे.