NCP Political Crisis: अजित पवार यांच्यासह समर्थक आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार का? कायदेतज्ज्ञ म्हणाले...

NCP Political Crisis: अजित पवार यांच्यासह समर्थक आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार का, यावर वकील दिलीप तौर यांनी भाष्य केलं आहे.
NCP Political Crisis
NCP Political CrisisSaam tv
Published On

प्रमोद जगताप

New Delhi News: अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शिंदे सरकारमध्ये सामील झाल्याने मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. अजित पवारांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांनी बंड करत थेट पक्षावर दावा केला आहे. तर दुसरीकडे शरद पवारांच्या नेतृत्वाखालील पक्षाने ९ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केली आहे. यानंतर अजित पवार यांच्यासह समर्थक आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार का, यावर वकील दिलीप तौर यांनी भाष्य केलं आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीतील मोठ्या फूटीनंतर राज्यात मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. यावर सर्व घटनेवर वकील दिलीप तौर म्हणाले, 'शिवसेनेतील फूट आपल्या समोर आहे. त्यांची शिंदे गट आणि ठाकरे गटासारखीच ही प्रक्रिया होईल. काही लोकांनी विधानसभा अध्यक्षांकडे ९ आमदार अपात्र करण्यासाठी याचिका दाखल केली आहे'.

NCP Political Crisis
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे CM शिंदेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत, सुप्रीम कोर्टात दाखल केली याचिका

'एखाद्या पक्षात दोन गट पडले तर मूळ पक्ष कोणता आहे, हे पाहावे लागेल. त्यानंतर व्हिप कोणाचा लागू होईल हे पाहावे लागेल. अशावेळी दोन्ही गट आम्हीच मूळ पक्ष आहोत, असा दावा करतात. या सर्व बाबींवर निवडणूक आयोग निर्णय घेतो. यामुळे दोन्ही गट निवडणूक आयोगाला अर्ज करतात. त्यानंतर आयोग निर्णय घेतो, असे तौर म्हणाले.

मूळ पक्षाचा व्हिप बंडखोरांना लागू होईल का, तौर म्हणाले, 'मूळ पक्षाचा व्हिप आमदारांसाठी लागू होतो. व्हिप कोणत्या परिस्थितीत लागू होत नाही, त्याचेही काही प्रावधान आहेत. एका गटाकडे लोकप्रतिनिधींची संख्या दोन-तृतीयांशांहून अधिक असेल तर त्यांना व्हिप लागू होणार नाही'.

मूळ पक्ष आमदारांवर कारवाई करू शकतो का, या संदर्भात भाष्य करताना तौर म्हणाले,'एखादा मूळ पक्ष आमदाराला पक्षातून बडतर्फ करू शकतो. तसेच त्यांच्याविरुद्ध विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल करू शकतो. मात्र, त्याची आमदारकी रद्द करू शकत नाही. त्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे आहे'.

'कोणत्याही पक्षात दुफळी निर्माण झाली तर दोन्ही गट आम्हीच मूळ पक्षच आहोत, असा दावा करतात. दोन्ही गटांना नेमलेला पक्षाच्या संघटनेत प्रतिनिधी दाखवावे लागतात. या प्रकरणात सर्व अधिकार हे अनुक्रमे निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाला आहे, असे तौर म्हणाले.

NCP Political Crisis
BJP Council of Ministers: आगामी लोकसभा सोडाच, भाजपच्या मंत्री परिषदेत ठरला 2047 पर्यंतचा मेगा प्लान?

'मूळ पक्ष कोणता आहे, यासाठी काही तत्वे दिली आहेत. दोन्ही गटांनी कायदेशीर अभ्यास केलाच असेल. त्यानंतर परिस्थितीला सामोर जात असावेत. दोन्ही गटात एकमेकांमध्ये समजूतपणा दाखवून वाद सोडवले तर कोणताच वाद पुढे होणार नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com