Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे CM शिंदेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत, सुप्रीम कोर्टात दाखल केली याचिका

Uddhav Thackeray Latest News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का देण्याची तायरी ठाकरे गटाने केली आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray saam tv

>> प्रमोद जगताप, साम टीव्ही

Maharashtra Politics: अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एककीकडे पक्षात झालेल्या बंडानंतर शरद पवार मैदानात उतरले आहेत, तर दुसरीकडे अधीच बंडखोरीचा सामना केलेले उद्धव ठाकरे देखील अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का देण्याची तायरी ठाकरे गटाने केली आहे.

उद्धव ठाकरे गटाने पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेतून विधानसभा अध्यक्षांना लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Uddhav Thackeray
Maharashtra Political Crisis: ठाकरे गटही अ‍ॅक्शन मोडमध्ये, मविआबाबत आज भूमिका जाहीर करण्याची शक्यता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या निलंबनाबाबत दाखल असलेल्या याचिकांवर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना द्यावेत अशी मागणी सुरेश प्रभू यांनी केली आहे. त्यांच्या या याचिकेवर सुप्रीम कोर्टात लवकरच सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. (Breaking News)

वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदारांना सोबत घेऊन वेगळा गट स्थापन केला होता. शिवसेनातील या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे यांच्या नेतृत्वातील या गटाने भाजपच्या पाठिंब्याने राज्यात युती सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. (Latest Political News)

Uddhav Thackeray
BJP Council of Ministers: आगामी लोकसभा सोडाच, भाजपच्या मंत्री परिषदेत ठरला 2047 पर्यंतचा मेगा प्लान?

परंतु उद्धव ठाकरे यांनी बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई केली होती. परंतु हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले आणि कोर्टाने हा आपला अधिकार नसल्याचे म्हणत विधानसभा अध्यक्षांकडे हे प्रकरण सोपवलं आहे. तसेच त्यांना योग्य मुदतीत निर्णय घेण्याचे निर्देश देखील दिले आहेत. परंतु विधानसभा अध्यक्षांनी अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश देण्यासाठी ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com