Maharashtra Political Crisis: ठाकरे गटही अ‍ॅक्शन मोडमध्ये, मविआबाबत आज भूमिका जाहीर करण्याची शक्यता

Uddhav Thackeray Will Explain His Position Today : उद्धव ठाकरे महाविकास आघडीबाबत काय भूमिका जाहीर करणार याकडे आता सर्वांच लक्ष लागलं आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray saam tv
Published On

>>निवृत्ती बाबर

Maharashtra Politics News Updates: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर आता उद्धव ठाकरे देखील अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. ठाकरे गटात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज पक्षातील आमदार, खासदार आणि नेत्यांची बैठक बोलावली आहेत.

या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या बैठकीत पक्षातील प्रमुख नेत्यांशी चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे नेत्यांसोबत देखील चर्चा करतील आणि त्यानंतर आपली भूमिका मांडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.उद्धव ठाकरे महाविकास आघडीबाबत काय भूमिका जाहीर करणार याकडे आता सर्वांच लक्ष लागलं आहे. (Breaking News)

Uddhav Thackeray
Maharashtra Politics: अजितदादांच्या शपथविधीनंतर शिंदे गटात धुसफूस वाढली; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड पुकारल्यानंतर राज्यांमध्ये राजकीय पेच निर्माण झालेला आहे. या प्रसंगानंतर ठाकरे गटाची काय भूमिका असावी या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी मातोश्री आज साडेबारा वाजता आमदार, खासदार आणि नेत्यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये सध्याच्या राज्यातील संपूर्ण राजकीय घडामोडींवर चर्चा केली जाणार आहे.

खरंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर या घडामोडींनंतर मोठा पेच निर्माण झालेला आहे. कारण महाविकास आघाडीतील पक्ष असलेल्या राष्ट्रवादीतील नेत्यांपैकी बहुसंख्य नेते युती सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे आता पुढची भूमिका काय असावी या संदर्भात ठाकरे गट भूमिका ठरवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. (Latest Political News)

Uddhav Thackeray
Petrol Diesel Prices 4 July: सामान्यांच्या खिशाला कात्री; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ

ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी आपण स्वतंत्र लढावे अशी भूमिका घेतली आहे अशी देखील माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे गट या पेचप्रसंगातून काय मार्ग काढतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करतील अशी देखील माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com