लातूरमध्ये अंधश्रद्धेच्या पैशांचा पाऊस, 20 कोटींच्या आमिषानं अघोरी कृत्य

Black Magic Exposed in Latur: नाशिक, पुण्यानंतर आता लातूरमध्येही अंधश्रद्धेचा बाजार मांडण्यात आलाय. महत्त्वाचं म्हणजे, यावेळी अघोरी प्रकारात एका अल्पवयीन मुलीचा वापर झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. अंधश्रद्धेच्या नावाखाली कोट्यवधींचा पाऊस पाडण्याचा कट कसा उघडकीस आला? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
LATUR BLACK MAGIC CASE
LATUR BLACK MAGIC CASEsaam tv
Published On

राज्याच्या कानाकोपऱ्यात अंधश्रद्धेचं जाळं किती घट्ट रुजलंय, याचं भयाण वास्तव समोर आणणाऱ्या घटना सातत्यानं समोर येत आहेत. पुण्यानंतर आता लातूरमधून अघोरी कृत्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. लातूर-उदगीर मार्गावरील करडखेल पाटीजवळ, उदगीरपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिलीये. पैशांचा पाऊस पाडण्याच्या विधीसाठी लक्ष्मीपूजा आयोजनाचा डाव उदगीर ग्रामीण पोलिसांनी उधळून लावलाय.

फुंडलिक देवराव रूपनर आणि सचिन साहेबराव भोंगळे या दोघांनी आपल्या साथीदारांच्या संगनमतानं पैशाचा पाऊस पाडण्यासाठी लक्ष्मीपूजेचं आयोजन केलं. तब्बल 20 कोटी रुपयांचा पाऊस पाडण्याच्या आमिषानं अघोरी विधी करण्याचा डाव होता. या विधीसाठी आंध्र प्रदेशातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा वापर करण्यात आला. या अघोरी प्रकाराची माहिती मिळातच पोलिसांनी हा अघोरी प्रकार उधळून लावला. या प्रकरणात महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि पुणे परिसरातील संशयितांचाही समावेश आहे.

लातूरमध्ये आंतरराज्यीय टोळींच्या माध्यमातून याआधीही अशा पद्धतीनं अघोरी प्रकार घडल्याचं अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं म्हटलंय. एव्हंढच नाही तर या प्रकारामागे नरबळीची शक्यताही अंनिसनं व्यक्त केलीये. त्यामुळे आता उदगीर ग्रामीण पोलिसांनी प्रकरणाचा पुढील तपास सुरू केलाय. य़ा अघोरींनी यापूर्वीही असे प्रकार केले आहेत का? अल्पवयीन मुलीला नेमक्या कोणत्या उद्देशाने आणण्यात आले होते? यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? या नरबळीचाही प्रकार झालाय का? याचा सखोल तपास करणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com