Accident News : रक्षाबंधन अखेरचं ठरलं! दुचाकीवरून जाणाऱ्या कुटुंबातील ४ जणांना ट्रकने उडवलं; बहीण भावाचा जागीच मृत्यू

Latur Accident News : लातूरच्या रेणापूरमध्ये भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने बहीण-भावाचा जागीच मृत्यू झाला. आई आणि चिमुकला पुतण्या गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत.
Latur Accident News
Latur Accident News AI Image
Published On
Summary
  • लातूरच्या रेणापूरमध्ये भीषण अपघात

  • भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली

  • भीषण अपघातात बहीण भावाचा मृत्यू, २ जण गंभीर

  • पोलिसांनी ट्र्क चालकाला केली अटक

रक्षाबंधन आटपून कामानिमित्त बाहेर निघालेल्या बहीण भावावर काळाने घाला घातला आहे. लातूरमधील रेणापूरच्या ग्रामीण रुग्णालयाकडे निघालेल्या बहीण-भावाच्या दुचाकीला भरधाव ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बहीण-भावाचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेली आई आणि चिमुकला पुतण्या गंभीर जखमी झाले. ही हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी साडे दोनच्या सुमारास रेणापूर येथे घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रतीक क्षीरसागर आणि त्यांची बहीण कल्याणी घोबाळे अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणी घोबाळे यांची मावस बहीण नंदिनी भोसले आजारी असल्याने त्यांना उपचारासाठी रेणापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी प्रतीक, त्यांची बहीण कल्याणी, आई आणि पुतण्या हे चौघे दुचाकीवरून लातूरहून रेणापूरकडे निघाले होते.

Latur Accident News
Amla Benefits : केसांपासून ते पचनापर्यंत होतील 'हे' ६ फायदे, आवळ्याचा ज्यूस १५ दिवस रोज पिऊन पाहा

दुचाकी रुग्णालयाच्या काही अंतरावर असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, प्रतीक आणि कल्याणी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकने दोघांचे मृतदेह जवळपास शंभर फूट अंतरापर्यंत फरफटत नेल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, आजारी मावस बहिणीला भेटण्यासाठी कल्याणी काही दिवसांपूर्वीच मुंबईहून माहेरी आल्या होत्या.

Latur Accident News
Cucumber Benefits : काकडी सोलायची की नाही? ९०% लोक करतात ही चूक; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत

रक्षाबंधनासाठी सुमारे दहा दिवसांपूर्वी घरी त्या आल्या होत्या. रक्षाबंधन झाल्यानंतर आजारी असलेल्या मावस बहिणीला भेटून त्या पुन्हा मुंबईला जाणार होत्या. मात्र, नियतीला काही वेगळेच मंजूर होते. या अपघातात माया क्षीरसागर आणि चिमुकला साई क्षीरसागर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com