अभिजीत साेनावणे / फय्याज शेख
Igatpuri News : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कावनई किल्लावरील (Kavnai Fort) दरड कोसळली. या घटनेत कुठल्याही प्रकारचे जीवित हानी झालेली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. (Maharashtra News)
नाशिक (nashik) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. प्रशासनाने ट्रेकींग पाॅईंटसवर जाताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे. आज (शुक्रवार) कावनई किल्ल्याच्या डोंगरावरील मोठा भाग खचून खाली आला. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही.
या घटनेची (landslides) माहिती कळताच तहसिलदार अभिजित बारवकर हे अन्य अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत घटनास्थळी तातडीने रवाना झाले. प्रशासकीय अधिका-यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही अशी माहिती अधिका-यांनी साम टीव्हीला सांगितली.
दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पालकमंत्री दादा भुसेंचे आवाहन
या घटनेबाबत नाशिक पालकमंत्री दादा भुसे (nashik guardian minister dada bhuse) म्हणाले कावनाई किल्ल्याचा भाग कोसळलेला असून सुदैवाने कुठलीही जीवित आणि वित्त हानी झालेली नाही. मी स्वतः तेथील प्रांत, तहसील तसेच स्थानिक नागरिकांशी मोबाइलद्वारे बोललो आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे.
विटूर्ली शिवारात दोन घर आहेत. त्यांना तातडीने गावठाण येथे स्थलांतरित केले आहे. तहसीलदार स्वतः त्या ठिकाणी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
सद्या पावसाचे वातावरण असल्याने ट्रेकर्सने देखील टेकडी, किल्ले किंवा धोकादायक ठिकाणे जाणे टाळावे. नागरिकांना काही अडचण असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच नाशिक जिल्हा पालकमंत्री कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन मंत्री दादा भुसे यांनी केले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.