Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना मकरसंक्रातीला खुशखबर मिळणार? खात्यात ₹३००० येण्याची शक्यता

december ladki bahin installment date : लाडकी बहीण योजनेअंतर्गत मकरसंक्रांतीला डिसेंबर आणि जानेवारीचे ३००० रुपये एकत्र खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. गिरीश महाजन यांच्या ट्वीटमुळे आशा वाढली असून, मात्र आचारसंहितेमुळे विलंब होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी!
Ladki Bahin Yojana UpdateSaam Tv
Published On

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana december installment date update : मकरसंक्रातीला राज्यातील २.५ कोटी लाडक्या बहि‍णींना खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून राज्यातील लाडक्या बहि‍णींच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्र जमा करण्यात येण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्याचे १५०० रूपयांचा हप्ता जानेवारीमध्ये लाडकीच्या खात्यात जमा झाला. डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्याचे ३००० रूपये कधी येणार? याबाबत लाडक्या बहि‍णींमध्ये उत्सुकता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मकरसंक्रातीला राज्यातील लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ३००० जमा होणार आहे.(December January installment Ladki Bahin scheme)

मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबतचे अधिकृत ट्वीट केलेय. त्यामुळे १४ जानेवारीपर्यंत आधीच लाडक्या बहि‍णींच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे येणार असल्याची चर्चा आहे. राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. १५ जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी राज्यात मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहि‍णींच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्याचे पैसे येण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी!
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी, डिसेंबर-जानेवारीचे ₹३००० खात्यात एकत्र येणार

आधिकाऱ्यांचे म्हणणं नेमकं आहे काय?

महिला आणि बालविकास मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने TOI ला सांगितले की, 'लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या हप्त्याला विलंब होऊ शकतो. निवडणुका संपेपर्यंत आचारसंहिता लागू राहील. त्यामुळे निधी मिळण्यासाठी वाट पहावी लागू शकते.' पण मंत्री गिरीश महाजन यांनी १४ जानेवारीच्या आधी लाडकीच्या खात्यात तीन हजार जमा होतील, असे ट्वीट केलेय. त्यामुळे खात्यात नेमके पैसे कधी येणार? हा प्रश्न तसाच आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी!
Jaipur Accident: हायवेवर रात्री भयानक अपघात! भरधाव कारने १६ जणांना उडवले, अन्...

जानेवारीत आले नोव्हेंबरचे १५०० -

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नोव्हेंबर महिन्याचा निधी जानेवारी महिन्यात वितरीत करण्यात आला. सुरुवातीला महिलांना ३,००० रुपये एकरकमी मिळतील, असा अंदाज वर्तवला जात होता. पण या महिन्यात महिल्यांच्या खात्यात फक्त १,५०० रुपये जमा झाले. १४ जानेवारी रोजी पैसे येतील की नाही? हे अद्याप माहित नाही. पण जर पैसे येणार असतील तर किती येणार? हाही प्रश्न आहेच.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी!
Ladki Bahin Yojana : महापालिकेच्या मतदानाआधी लाडकीच्या खात्यावर ₹३००० येणार, भाजप नेत्याचा दावा

या लाडकीचे १५०० बंद

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना eKYC पूर्ण करण्यास मुदत दिली होती. ३१ डिसेंबरपर्यंत लाडक्या बहि‍णींना ईकेवायसी करायची होती. पण लाखो महिलांनी ईकेवायसी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे ज्या महिलांनी ईकेवायसी केली नाही, त्यांचा १५०० रूपयांचा लाभ बंद करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी!
Public Holiday : पुढच्या गुरूवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी, शाळा-सरकारी कार्यालये राहणार बंद

EKYC ची तारीख पुन्हा वाढवली नाही

महापालिका निवडणुका लक्षात घेता, eKYC साठी आणखी एक संधी मिळू शकते, असा दावा केला जात होता. पण ३१ डिसेंबरनंतर ईकेवायसी करण्याची मुदत सरकारने वाढवली नाहीच. पोर्टलवरून eKYC प्रक्रिया पर्याय देखील काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे ज्या महिलांनी ई केवायसी केलेली आहे, आणि त्या पात्र असतील तर त्यांना लाभ मिळणार आहे. ज्यांनी ई केवायसी केलेली नाही त्या महिल्यांना महिन्याला मिळणारा लाभ बंद करण्यात येणार आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी!
धक्कादायक! भाजप नेता स्टेजवर चढताना धाडकन तोंडावर आपटला, व्हिडिओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com