Jaipur Accident: हायवेवर रात्री भयानक अपघात! भरधाव कारने १६ जणांना उडवले, अन्...

Jaipur Audi car accident latest news : जयपूरच्या मानसरोवर परिसरात भरधाव ऑडी कारने १६ जणांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून चार जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सवाई मान सिंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Jaipur Audi car accident latest news
Jaipur Audi car accident latest news Google
Published On

Speeding car hits 16 people in Jaipur : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये ऑडी कारचा भयंकर अपघात झालाय. भरधाव वेगात असलेल्या कारने १६ जणांना धडक दिली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. तर ४ जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. अपघातानंतर रस्त्यावर एकच गोंधळ उडाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

जयपूरमधील मानसरोवर परिसरात शुक्रवारी रात्री दहा ते ११ या वेळात भरधाव वेगात असलेल्या कारचा अपघात झाला. लोक रस्त्याच्या बाजूने चालत घराकडे निघाले होते. काही जण फूड स्टॉलवर जेवण करत होते. त्याचवेळी अचानक भरधाव वेगात असलेली कार डिव्हायडरला धडकली. त्यानंतर चालकाचे संतुलन बिघडले अन् एकापाठोपाठ एक १६ जणांचा धडक दिली. कारने फूड स्टॉललाही जोरात धडक दिली. या भयानक अपघातामध्ये एकाचा जागेवरच मृत्यू झाला. तर १६ जणांना दुखापत झाली आहे. जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामधील चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Jaipur Audi car accident latest news
Mumbai Fire : घरातील फ्रीजचा अचानक स्फोट, ३ जणांचा जिवंत जळून मृत्यू, मुंबईतील भयानक घटना

मानसरोवर परिसरात अपघात झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. लोकांना पळता भुई थोडी झाली. अनेकजण आपला जीव मुठीत घेऊ सैरवैर धावत सुटले होते. अपघातानंतर संतप्त जमावाने कारमधील दोन जणांना बेदम मारहाण केली. कारमधील चार जण पळून गेले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू केला आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांच्या मते, कारमधील प्रवासी दारूच्या नशेत होते.

Jaipur Audi car accident latest news
Accident : भरधाव थारने ६ जणांना चिरडले, संतापलेल्या जमावाने कार पेटवली, रस्त्यावरच राडा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूरच्या मानसरोवर परिसरात शुक्रवारी रात्री १० वाजता ही घटना घडली. मुहाना पोलिस स्टेशनचे अधिकारी गुरु भूपेंद्र सिंह यांनी सांगितले की, वेगाने येणारी ऑडी प्रथम डिव्हायरला जोरात धडकली. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर अनियंत्रित झालेली कार रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमारे १०-१२ गाड्यांना धडकली आणि गाड्यांजवळ उभ्या असलेल्या १६ जणांना उडवले. यामध्ये एकाचा जागेवरच मृत्यू झाला. तर अन्य १५ जण जखमी झालेत. त्यामधील ११ जणांना किरकोळ दुखापत झाली. चार जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सवाई मान सिंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातातील मृताची अद्याप ओळख पटलेली नाही.

Jaipur Audi car accident latest news
Public Holiday : पुढच्या गुरूवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी, शाळा-सरकारी कार्यालये राहणार बंद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com