Chandrashekhar Bawankule: कुणबी दाखल्यांचा वाद पेटणार! 'नोंदी रद्द करण्यासाठी बावनकुळेचं पत्र'; लाखो प्रमाणपत्रं, पडताळणीत हजारोच वैध?

Manoj Jarange On Chandrashekhar Bawankule: कुणबी दाखल्यांचा वाद चांगलाच वाढला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केलेत.
Chandrashekhar Bawankule: कुणबी दाखल्यांचा वाद पेटणार! 'नोंदी रद्द करण्यासाठी बावनकुळेचं पत्र'; लाखो प्रमाणपत्रं, पडताळणीत हजारोच वैध?
Manoj Jarange On Chandrashekhar BawankuleSaam Tv
Published On
  • कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यावरून मनोज जरांगे यांचा बावनकुळेंवर आरोप

  • कुणबी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची जिल्हानिहाय आकडेवारी

  • मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राचा वाद

  • कुणबी नोंदी रद्द केल्याच्या आरोपावर बावनकुळेंचे स्पष्टीकरण

सुप्रीम मसकर, साम टीव्ही

कुणबी दाखल्यांवरून पुन्हा राजकारण पेटलंय. आता जरांगेंनी महसूलमंत्री बावनकुळेंवर मोठा आरोप केलाय? तर दुसरीकडे लाखो कुणबी दाखले मिळाले असले तरी वैध दाखल्यांवरून वाद निर्माण झाला. जरांगेंचा आरोप काय आणि दाखल्यांचा वाद काय? यावरचा हा रिपोर्ट...

मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपावरून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मराठा समाजाच्या नोंदी रद्द करण्यासाठी तहसीलदारांना पत्र दिल्याचा गंभीर आरोप केलाय. मात्र जात वैधता समिती स्वतंत्र असल्यानं मंत्र्यांना त्यात हस्तक्षेप करता येत नसल्याचा पुनरुच्चार करत बावनकुळेंनी जरांगेंचे आरोप फेटाळून लावलेत.

Chandrashekhar Bawankule: कुणबी दाखल्यांचा वाद पेटणार! 'नोंदी रद्द करण्यासाठी बावनकुळेचं पत्र'; लाखो प्रमाणपत्रं, पडताळणीत हजारोच वैध?
Kunbi Caste Validity Certificate: कुणबी प्रमाणपत्रासाठीचे किती अर्ज वैध अन् अवैध ठरले? जिल्हानिहाय आकडेवारी आली समोर

दुसरीकडे मराठवाड्यात आतापर्यंत 3 लाखांहून अधिक नागरिकांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय. मात्र जात प़डताळणी करणाऱ्यांची संख्या एकीकडे नगण्य असली तरी त्यातही 25 टक्के लोकांचे अर्ज अपात्र ठरल्याची माहिती समोर आलीय. बीड जिल्ह्यात 2 लाख 6 हजार 789 जणांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. त्यातील 13 हजार 512 लोकांनी जात पडताळणीसाठी अर्ज केला. ज्यातील 11 हजार 111 लोकांचे अर्ज पात्र ठरलेत. संभाजीनगर जिल्ह्यात 25 हजार 211 जणांना प्रमाणपत्र मिळाले असून त्यातील 1 हजार 267 जात पडताळणीसाठी अर्ज केला. त्यातील 1 हजार 80 जणांचे अर्ज पात्र ठरले. परभणीत 20 हजार 832 प्रमाणपत्र वाटप झाले त्यातील 254 जणांनी पडताळणीसाठी अर्ज केला असून त्यातील 150 अर्ज पात्र ठरले.

Chandrashekhar Bawankule: कुणबी दाखल्यांचा वाद पेटणार! 'नोंदी रद्द करण्यासाठी बावनकुळेचं पत्र'; लाखो प्रमाणपत्रं, पडताळणीत हजारोच वैध?
Kunbi Caste Validity Certificate: कुणबी प्रमाणपत्रासाठीचे किती अर्ज वैध अन् अवैध ठरले? जिल्हानिहाय आकडेवारी आली समोर

धाराशिव जिल्ह्यात 19 हजार 281 प्रमाणपत्र वाटप झाले त्यातील 1218 जणांनी पडताळणीसाठी अर्ज केला असून त्यातील 774 अर्ज पात्र ठरले. जालना जिल्ह्यात 18 हजार 53 प्रमाणपत्र वाटप झाले त्यातील 1461 जणांनी पडताळणीसाठी अर्ज केला असून त्यातील 922 अर्ज पात्र ठरले. हिंगोलीत 13 हजार 286 प्रमाणपत्र वाटप झाले त्यातील 523 जणांनी पडताळणीसाठी अर्ज केला असून त्यातील 341 अर्ज पात्र ठरले. नांदेड 4 हजार 830 प्रमाणपत्र वाटप झाले त्यातील 398 जणांनी पडताळणीसाठी अर्ज केला असून त्यातील 251 अर्ज पात्र ठरले. लातूरमध्ये 2 हजार 751 प्रमाणपत्र वाटप झाले. त्यात 1510 जणांनी पडताळणीसाठी अर्ज केला असून त्यातील 968 अर्ज पात्र ठरले.

Chandrashekhar Bawankule: कुणबी दाखल्यांचा वाद पेटणार! 'नोंदी रद्द करण्यासाठी बावनकुळेचं पत्र'; लाखो प्रमाणपत्रं, पडताळणीत हजारोच वैध?
Manoj Jarange Patil Kunabi Records | जरांगे पाटील यांना मराठा आरक्षण मिळणार का?

म्हणजे मराठवाड्यात एकूण 3 लाख 11 हजार 33 जणांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. त्यातील 20 हजार 143 जणांनी जात पडताळणी अर्ज केले असून त्यातील 15 हजार 597 अर्ज पात्र ठरले.. तर 4 हजार 546 अर्ज अपात्र ठरलेत. म्हणजे मराठवाड्यातील 25 टक्के अर्ज अपात्र ठरल्याचं स्पष्ट होतयं. दरम्यान जरांगेंनी बावनकुळेंवर नोंदी रद्द केल्याचा आरोप केल्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही जरांगे पाटलांवर निशाणा साधला. "आरोप करायला फार अक्कल लागत नाही. ज्यांना सिस्टीम समजूनच घ्यायची नाही, त्यांच्याबद्दल काय बोलायचे? असं दरेकर म्हणालेत... तर जरांगेंनीही दरेकरांना चांगलच प्रत्युत्तर दिलंय.

Chandrashekhar Bawankule: कुणबी दाखल्यांचा वाद पेटणार! 'नोंदी रद्द करण्यासाठी बावनकुळेचं पत्र'; लाखो प्रमाणपत्रं, पडताळणीत हजारोच वैध?
Girish Mahajan On Kunabi Nondi News | एक जरी नोंद मिळाली तरी कुणबी दाखला-महाजन

आता कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला हा वाद येत्या काळात आणखी पेटण्याची चिन्हे आहे. एकीकडे कुणबी नोंदीच्या आधारे सर्व पात्र मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे द्यावीत या मागणीसाठी जरांगेंनी 29 ऑगस्टला उपोषणाचा इशारा दिलेले असताना मंत्र्याविरोधातील जरांगेंच्या या रोषाला कसं सरकार नेमकं कसं उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com