कोकणच्या समुद्रातून पाणी होतंय गायब? हजार फुटांची ओहोटी, त्सुनामीची नांदी?

Konkan Sea Water Retreat Tsunami Truth: उन्हाळ्याच्या सुट्टीत समुद्रकिनारी मनसोक्त बागडायला जाणाऱ्यांना आता किनाऱ्यावर वाळूचे ढीग पाहायला मिळतायत....कोकणच्या समुद्रातून पाणी गायब होतंय? होय... तुम्ही बरोबर ऐकलंत... त्यामुळे कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर हा मोठा बदल नेमका का होतोय.... नेमकं हे प्रकरण काय आहे?
Sea water recedes dramatically at Konkan and Surat beaches, exposing vast stretches of sand during extreme low tide.
Sea water recedes dramatically at Konkan and Surat beaches, exposing vast stretches of sand during extreme low tide.saam tv
Published On

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कोकणात सुमद्रकिनारी फिरायला जाताय का... आम्ही असं का म्हणतोय... कारण, ज्या अथांग समुद्राच्या लाटा पाहण्यासाठी तुम्ही गर्दी करता, त्याच किनाऱ्यांवरून आता समुद्रावर दूर चाललाय. आणि बीचवरची मोठे खड्डे पडू लागले आहेत....

हा व्हिडीओ आहे सिंधुदुर्गमधल्या तोंडवळी समुद्रकिनाऱ्यावरचा... त्याचं झालं असं की, मान्सूनचे आगमन काही दिवसांवर असताना समुद्रात मोठे बदल दिसून येत आहेत. सिंधुदुर्गातल्या तोंडवळी समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात वाळूचे मोठमोठे ढीग दिसून येत आहेत. तर दुसरीकडे, गुजरातच्या सुरतमधील डुमास बीचवरून पाणी अचानक नाहीसे झालंय. समुद्राचे पाणी अचानक मागे सरकल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय...

सुरतमधील डुमास बीचवर जेव्हा पर्यटक पोहोचले, तेव्हा त्यांना समुद्रात पाणीच दिसले नाही. गुजरातमधील समुद्रकिनारी पाणी अचानक 1000 फुटांपेक्षा जास्त मागे सरकल्याचं समोर आलंय. महत्त्वाचे म्हणजे, काही वेळापूर्वीच ज्या ठिकाणी समुद्राची पातळी अनेक फूटांनी वाढली होती, त्याच ठिकाणी समुद्राचे पाणी 1000 फुटांपेक्षा जास्त मागे सरकल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

अचानक लागलेल्या या मोठ्या ओहोटीमागचं कारण जाणून घेण्यांसाठी आम्ही तज्ज्ञांशी संपर्क साधून यामागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. खरंतर, निसर्गात होणारे हे बदल आपल्याला थक्क करणारे वाटत असले, तरी ते कोणत्याही संकटाची नांदी नाहीत. बदलतं हवामान, मान्सूनपूर्व वाऱ्याचा वेग आणि समुद्राच्या तळाशी होणाऱ्या हालचालींमुळे अशा घटना घडत असतात. त्यामुळे गुजरात असो वा कोकण... समुद्रात दिसणारे हे बदल सुनामीसारख्या प्रलयाचे संकेत नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com