गोव्याला पर्यटनासाठी जाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.आता मुंबईतून गोव्याला जाणार सहज सोपं आणि सुसाट होणार आहे. मुंबई ते गोवा कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नवीन एक्स्प्रेस वे बांधण्याची योजना आखलीय. हा प्रकल्प मंजूर झाला तर मुंबईतून गोव्याला अवघ्या ६ तासात पोहोचता येणार आहे.
कोकण द्रुतगती मार्गाच्या नावाने बांधण्यात येणारा हा ६ लेन रस्ता मुंबई आणि गोवा दरम्यान लागणारा वेळ निम्मा करणारा ठरणार आहे. ३७६ किमी लांबीचा कोकण द्रुतगती मार्ग हा एक प्रवेश-नियंत्रित महामार्ग असेल जो मुंबईला सिंधुदुर्गला जोडेल. या नवीन एक्स्प्रेस वेमुळे मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवासाचा वेळ सध्याच्या १२-१३ तासांवरून केवळ ६ तासांवर होणार आहे. यामुळे प्रवाशांना जलद प्रवासाचा अनुभव मिळेल.
कोकणातून जाणाऱ्या या एक्स्प्रेस वेला अनेक डोंगर, नदी नाले ओलांडत लावे लागणार आहे. कोकण द्रुतगती मार्ग प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आलाय. प्रकल्पासाठी पर्यावरण मंजुरी मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रकल्पातून पर्यावरणाची हानी होणार नाही, याचादेखील विचार सरकार करत आहे. महाराष्ट्रासाठी हा हायवे एक प्रगती पथ ठरणार आहे.
यामुळे मुंबई आणि गोवा यांच्यातील कनेक्टिव्हिटी तर सुधारेलच पण या क्षेत्राच्या आर्थिक विकासातही मोठा हातभार लागेल. त्यामुळे पर्यटनालाही चालना मिळेल. एक्स्प्रेस वेच्या आजुबाजूच्या जिल्ह्यांमध्येही रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. कोकण द्रुतगती मार्गाचे बांधकाम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) हा प्रकल्प बांधणार आहे. त्याची एकूण लांबी ३७६ किलोमीटर असणार आहे.
हा ६ लेन एक्स्प्रेस वे पनवेल (नवी मुंबई) ते रायगड आणि रत्नागिरी मार्गे सिंधुदुर्गकडे जाणार आहे. एका वृत्तानुसार, या प्रकल्पासाठी ६८,००० कोटी रुपये खर्च केला जाणार आहेत. एक्स्प्रेस वेसाठी ३,७९२ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. एक्स्प्रेस वेवर १४ इंटरचेंज बांधले जाणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.