Kharat Case : कोंबडीचोर खरात कसा बनला कॅप्टन? गावकऱ्यांनी काढली भोंदू खरातची कुंडली

Kharat childhood crimes and background story : भोंदू बाबा खरातच्या भूतकाळाबाबत गावकऱ्यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. कोंबडी चोरीपासून ते हजारो कोटींच्या साम्राज्यापर्यंतचा प्रवास उघड झाला असून प्रकरणाची चौकशी अधिक गडद होत आहे.
Kharat childhood crimes and background story
Kharat childhood crimes and background story Saam
Published On

खरातमध्ये विकृतीची कुंडलीच त्याच्या गावकऱ्यांनी साम टीव्हीसमोर मांडलीय.. कोंबडीचोर असलेल्या खरातचा कॅप्टन खरात कसा झाला? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट..

ढोंगी..... वासनांध आणि विकृत आणि पाखंडी खरातचे रोज नवे नवे कारनामे समोर येत आहेत....तंत्र मंत्रांच्या नावानं महिलांचं शोषण करणारा खरातचे लहानपणीचे उद्योगही आता उघड झाले आहेत. लहानपणी खरात कोंबड्या चोरत असल्याचा दावा त्याच्या गाववाल्यांनी केलाय. त्याच्या कहांडळवाडीतल्या गावकऱ्यांनी खरातच्या काळ्या कारनाम्यांची कुंडलीच उघड केलीय.

Kharat childhood crimes and background story
५ महिलांचे लैंगिक शोषण, ८ महिलांचे ३५ व्हिडिओ, भोंदू खरातचे अश्लील चाळे; CM फडणवीसांनी सांगितली A to Z माहिती

होय...लहानपणी चोऱ्या करणारा.... मुलींची छेड काढणारा... आणि त्यानंतर दहावीला नापास झालेला झालेला हाच तो भोंदू खरात... या उद्योगांमुळे पोलिस पकडून नेतील या भीतीनं खरात दहावीनंतर गावातून पळून गेला...गाव सोडल्यानंतर पुढे हाच खरात मर्चंट नेव्हीत गेला... मर्चंट नेव्हीतून 2006 मध्ये निवृत्त झाल्यानंतर याच भोंदूने अंकगणिततज्ज्ञ असल्याचा दावा करत लोकांना गंडा घालायला सुरूवात केली. ईशान्येश्वर मंदिर उभारुन लोकांचा विश्वास जिंकला... पुढे राजकीय नेते... उद्योगपती... प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरुन याच खरातनं आपलं हजारो कोटींचं साम्राज्य उभं केलं... आणि स्वतःची कॅप्टन खरात अशी ओळख निर्माण केली...त्यानं जादूटोणा...काळीजादू करत महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं... आणि सुरु झाला महिलांवरच्या अत्याचाराचा विकृत धंदा.....

Kharat childhood crimes and background story
Captain kharat : बलात्कार प्रकारणातील कॅप्टनचं आणखी एक प्रकरण उघड, शिर्डी कनेक्शन आलं समोर

खरातनं आमच्या गावाचं नाव खराब केलं.. त्यामुळे भोंदू खरातला फाशी देण्याची मागणी गावकऱ्यांनी केलीय..

कोंबडीचोर... मुलींची छेड काढणारा आणि आता तंत्रमंत्राच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढून अत्याचार करणारा भोंदू खरात लहानपणापासूनच चोऱ्या चपाट्यांचा विकृत शोक होता... आता त्याच पाच दशकांच्या विकृतीचा पर्दाफाश झालाय.त्यामुळे खरातच्या विकृतीला कायमचं ठेचण्याची गरज आहे...

सचिन बनसोडे साम टीव्ही न्यूज, नाशिक

Kharat childhood crimes and background story
भोंदू खरातकडे ₹१५०० कोटींची संपत्ती, शेकडो एकर जमीन कुठे कुठे लुबाडली? SIT तपासातून धक्कादायक माहिती समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com