Nashik Captain Kharat case : बलात्कार प्रकरणात अटकेत असलेल्या नाशिकच्या कॅप्टन खरात याच्याबाबत दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि फसवणूक केल्याप्रकरणात खरात अडचणीत सापडलाय. आता यामध्ये त्याच्या ऑफिसमधील एकाचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिलेला अश्लील डीफफेक आणि मॉर्फ व्हिडिओ पाठवल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपासही आता एसआयटीकडून होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या कॅप्टन खरातचे आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. खरातच्या ऑफिसमधील ऑफिस बॉयवर शिर्डीत गुन्हा दाखल झाला होता. नीरज जाधव नावाच्या ऑफिस बॉयवर १८ फेब्रुवारी २०२६ रोजी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. नीरज जाधवने पिडीत महिलेचे आक्षेपार्ह मोर्फ व्हिडीओचे स्क्रीनशॉट पाठवले होते. हे अश्लील व्हिडीओचे स्क्रीनशॉट पाहून महिलेला धक्का बसला होता. मोर्फ आणि AI जनरेटेड फोटो पाठवल्याप्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणाचा तपासही IPS तेजस्वीनी सातपुतेंच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या SIT कडून केला जाणार आहे.
तेजस्विनी सातपुते यांच्याकडे तपास -
एका महिलेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती समो आली आहे. १८ फेब्रुवारी रोजी IT ऍक्ट कलम 66 ( E ), 67 ( A ) आणि 351 ( 2 ) प्रमाणे नीरज जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकऱणात कॅप्टन खरात याचा सहभाग होता का? याचा तपासही एसआयटीकडून करण्यात येत आहे. 18 फेब्रुवारी रोजी दाखल झालेला गुन्हा स्पेशल इन्वेस्टिगेशन टीमच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्याकडे वर्ग झाला आहे.
3 कोटींची खंडणी -
नाशिकमधील स्वंयघोषित कॅप्टन अशोक खरात यालाच ब्लॅकमेल केल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खरात याच्याकडे तब्बल 3 कोटींची खंडणी मागण्यात आल्याची घटना समोर आली आहे. काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ असल्याचे सांगत कॅप्टन खरातकडे पैसे मागण्यात आले होते. सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्यात डिसेंबर 2025 मध्ये दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.