

गोकुळ दूध संघ निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं
भाजप आणि महाडिक गटाला डावलल्याची चर्चा
महायुतीत अंतर्गत तणाव वाढण्याची शक्यता
पात्र-अपात्र संस्थांच्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
राज्यामध्ये लक्षवेधी ठरणाऱ्या गोकुळ दूध महासंघाच्या निवडणुकीबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. गोकुळ दूध संघाच्या राजकारणात भाजप आणि महाडिक गटाला डावलल्याची चर्चा आता सत्ताधाऱ्यांच्या अंगलट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सावध भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे.
गोकुळ दूध संघाच्या गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली सत्तांतर झालं होतं. मात्र बदललेल्या राजकीय समीकरणांनंतरही महाडिक गटाला दूर ठेवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. वाढीव सभासदांवरील तक्रारी, चौकशीचे आदेश आणि निवडणूक प्रक्रियेतल्या अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या या सर्व घडामोडींमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.
मात्र या संपूर्ण प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी सावध भूमिका घेतली आहे. 'संस्थांची चौकशी होणं ही नियमित प्रक्रिया आहे. काही प्रकरणे उच्च न्यायालयातही आहेत. न्यायालय योग्य निर्णय देईल. नियमबाह्य संस्था मतदानातून बाहेर जातील, पात्र संस्था मतदान करतील.', अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच गोकुळमध्ये सत्तेत महायुतीच असल्याने मुख्यमंत्री हस्तक्षेप करणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.gokul
तर प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, 'कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व निवडणुका यापूर्वी महायुती म्हणून लढल्या आहेत गोकुळची निवडणूक सुद्धा महायुती म्हणूनच लढवली जाईल. असाच मतप्रवाह जिल्ह्यातील आणि राज्यातील नेत्यांचा आहे, पुढच्या आठवड्याभरात पात्र अपात्र संस्थांची यादी येईल, संस्थांचा निकाल लागेल आणि यानंतरच आम्ही महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाऊ.'
दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही सावध भूमिका घेत गोकुळची निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाईल, असे स्पष्ट केले आहे. पात्र-अपात्र संस्थांची यादी पुढील आठवड्यात स्पष्ट होईल, त्यानंतरच पुढील रणनीती ठरवली जाईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, वाढीव सभासद आणि कथित बोगस संस्थांबाबत दाखल झालेल्या याचिकांमागे महाडिक गटाचे पाठबळ असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे या संपूर्ण घडामोडींमध्ये भाजप नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.