

रणजित मांजगावकर, साम टीव्ही
Kolhapur Gold Biscuits News: कोल्हापूर जिल्ह्यातील गडमुडशिंगी या गावांमध्ये तळ्याशेजारी खेळणाऱ्या चार लहान मुलांना चक्क सोन्याची बिस्किट सापडल्याची घटना उघडकीस आलेली आहे. सोने सापडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी हे सोनं ताब्यात घेतले आहे. हे सोनं कोणाचं आहे हे अद्याप समजलं नसून या सोन्याची किंमत पाहून पोलिसही चक्रावून गेले आहेत.
तळ्याशेजारी सोन्याची बिस्किट (Gold Biscuits) नेमकी टाकलीत कुणी याचा पोलीस तपास करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील गडमुडशिंगी या गावाच्या मध्यभागी एक तळ आहे. या तळ्याच्या शेजारी अनेक लहान मुले खेळत असतात. 16 जुलै रोजी नेहमीप्रमाणेच याच गावातील चार ते पाच मुलं तळ्याच्या शेजारी खेळायला गेली होती.
खेळता खेळताना त्यांनी तळ्यामध्ये दगड मारण्यास सुरुवात केली. याचवेळी तळ्याशेजारी असणाऱ्या गवतात दगड घेत असताना त्यांना एक पिशवी दिसली आणि या पिशवीत चक्क सोन्याची बिस्किट आणि सोन्याचे कॉइन होते. पिशवीत सोन्याची बिस्किट असल्याचं कळताच या मुलांमधील दोन मोठ्या मुलांनी पिशवी घेऊन पळ काढला.
दरम्यान, तळ्याकाठी खेळत असताना मुलांना चक्क सोनं सापडल्याची बातमी संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली. काहींनी याची माहिती गांधीनगर पोलिसांना दिली. या घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी गडमुडशिंगी या गावात दाखल होत मुलांकडून सोनं हस्तगत केलं.
यामध्ये दहा ग्रॅम वजनाची चार लहान सोन्याची बिस्किटे, दहा ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे कॉइन आणि पाच ग्रॅम वजनाचा एक सोन्याचा छोटा कॉइन, अशी एकूण 394.400 ग्राम वजनाची ही सोन्याची बिस्किटे आणि कॉइन सापडलेली आहेत. हे सोनं तब्बल २४ लाख रुपये इतक्या किमतीचे आहे.
गडमुडशिंगी परिसरातील तळ्याकाठी मिळालेल्या सोन्याची बिस्किट आणि कॉइन यांची तपासणी करण्यासाठी हे काही सोनारांकडं पाठवण्यात आले. ही सर्व बिस्किटे आणि कॉइन खरी असल्याचं सोनारांनी सांगितलेला आहे. सोन्याची बिस्किट आणि कॉइन तळ्याकाठी कोणी टाकली याचा शोध गांधीनगर पोलीस घेत आहेत.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.