Live Blog Updates : नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक २३ ते २६ जुलै चार दिवसासाठी येलो अलर्ट जारी

Irshalwadi Rescue Operation Live: इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत २६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. एनडीआरएफच्या पथकाकडून सलग दुसऱ्या दिवशी बचावकार्य सुरू आहे.
Nanded Rain Update
Nanded Rain Updatesaam tv
Published On

नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक २३ ते २६ जुलै चार दिवसासाठी येलो अलर्ट जारी

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 22 जुलै 2023 रोजी दुपारी 01:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी आज दिनांक 22 जुलै 2023 या एक दिवसासाठी ऑरेंज (Orange) अलर्ट व दिनांक 23 ते 26 जुलै 2023 या चार दिवसासाठी येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे.

दिनांक 22 जुलै 2023 या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. दिनांक 23 ते 26 जुलै 2023 ह्या चार दिवसात जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Raigad News Irshalgad Landslide Update News: इर्शाळवाडी दरडग्रस्त ठिकाणी सर्वसामान्यांना प्रवेश बंद, बघ्यांच्या गर्दीमुळे मदतकार्यात अडथळा 

इर्शाळवाडी ठाकुरवाडी दरडग्रस्त ठिकाणी सर्वसामान्यांना प्रवेश बंद करण्याचा निर्णय रायगड जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. इरसालगड, नंबराची वाडी, बेस कॅम्प परिसरात तसेच दुर्घटनास्थळी सर्वसामान्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. शासकीय मदत यंत्रणा तसेच मदतकार्यात नेमणुक केलेल्या इतर व्यक्ती, सेवाभावी संस्था यांच्या व्यतिरिक्त इतर नागरिक, पर्यटक व ट्रेकर्स यांना आजपासून प्रवेश बंद करण्यात आला आहे.

Akola Rain News :अकोल्यात वाहणाऱ्या मोर्णा नदीला आला पूर

अकोला जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासुन मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अकोला शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीला मोठा पूर आलेला आहे.

Vasai Rain News :वसईच्या तुंगारेश्वर नदीत अडकलेल्या तीन पर्यटकांचे जीव वाचविण्यात यश

तुंगारेश्वरच्या नदीतील सुरक्षाच्या जाळीत पोहताना जाऊन अडकला असताना महाराष्ट्र सुरक्षा फोर्सच्या जवानांनी स्थानिक पर्यटकांच्या मदतीने 3 जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. 18 जुलै रोजी दुपारी ही घटना घडली होती. सतीश चव्हाण, मनोज पाटील, संदीप मराठे, महेश आटोळे आणि रवी मराठे असे पर्यटकांचे जीव वाचविणार्या एमएसएफ जवानांची नाव आहेत.

यवतमाळमध्ये पुरात अडकलेल्या नारिकांचं हेलिकॉप्टद्वारे रेस्क्यू ऑपरेशन

यवतमाळमध्ये पैनगंगा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. त्यामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात ४5 जण अडकले आहेत. सकाळपासून अडकलेल्या या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आता हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली आहे. आनंद नगर येथील हे नागरिक आहेत. हेलिकॉप्टपच्या साह्याने त्याने बाहेर काढण्यासाटी बचावकार्य सुरू आहे.

बुलडाण्यात कोसळधार; काथरगावातील पुरात काही लोक अडकले

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव येथील काही लोक पुरात अडकले आहेत. यामुळे नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हॅलिकॉप्टरची मागणी प्रशासनाने केले आहे. उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी ही माहिती दिली आहे. काथरगाव येथे नदीला महापूर आल्याने गावाला पाण्याने वेढा घातला आहे .

कोल्हापुरातील राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांना बंदी

कोल्हापुर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे. जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राऊतवाडी धबधब्याने रौद्ररुप धारण केले आहे. पाण्याच्या प्रवाहासोबत मोठमोठे दगड देखील खाली पडत आहेत.

या परिसरात येणारे पर्यटक जखमी होऊ नयेत, तसेच या परिसरात हुल्लडबाजी होऊ नये यासाठी राऊतवाडी धबधबा परिसरात कलम १४४ लागू करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. राधानगरी परिसरातील पडळी गावातच पर्यटकांना अडवण्यात येत असून पुढे सोडले जात नाही.

वाशिममध्ये खोराडी नदीला पूर, बेलोरा गावात शिरले पाणी...

वाशिम जिल्ह्यात दमदार पाऊस सुरूच असून खोराडी नदीला पूर आला आहे. या पुराचं पाणी मानोरा तालुक्यातील नदीच्या काठावर असलेल्या बेलोरा गावात शिरले आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. हे पाणी वेगाने गावात शिरत असून पावसाची संततधार कायम राहिली तर पूर वाढण्याची शक्यता आहे.

नांदेडमध्ये पावसाचा कहर, शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

नांदेड जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आलाय. काही तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने शेत जमिनी खरडून गेल्या, तर काही ठिकाणी शेतातील पिके वाहून गेली आहेत. जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पेरणीच्या सुरुवातीला वेळेवर पाऊस पडला नाही आणि आता पीक जमिनीवर चांगल्या स्थितीत असताना आस्मानी संकट शेतकऱ्यावर आलं आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरी अडचणीत सापडला आहे. या शेती पिकांचे पंचनामे न करता तात्काळ शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी आता शेतकरी करीत आहेत.

रत्नागिरीतील तोणदे गावाला पुराचा फटका

रत्नागिरीतील तोणदे गावाला पुराचा फटका रत्नागिरीतील तोणदे गावाला पुराचा फटका बसलाय इथली भातशेती पुर्णपणे पाण्याखाली गेलीय.गेल्या चार दिवसांपासून इथली भातशेती पाण्याखाली आहे पाण्याचा फुगवटा आल्यान मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.घाटमाथँवर पाऊस पडत असल्यानं काजळी नदिच्या पाणीपातळीत मोठ्याप्रमाणात वाढ झालीय आणि नदिचं पाणी तोणदे गावात शिरलय इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी...

यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा हाहाकार

यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नदी नाल्यांना पूर आला आहे. पैनगंगा, अरूणावती, अडाण, वाघाडीसह इतर नद्या-नाल्यांना पूर आल्याने शहरासह अनेक गावात पाणी शिरले. नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. विशेष म्हणजे पैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडल्याने उमरखेड, महागाव, आर्णी तालुक्यातील अनेक गावांना पुराचा तडाखा बसला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महागांव तालुक्यातील आनंद नगर इथे पुरात चाळीस जण अडकून पडले आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस

यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पैनगंगा, अरुणावती, अडान आदी प्रमुख नद्यांना पूर आल्याने प्रमुख महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पुरस्थितीमुळे महागाव तालुक्यातील आनंद नगर येथे ४० जण बोटीत अडकले आहेत.

Raigad Landslide: इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; बचावकार्यासाठी व्हाईट आर्मीचे जवान घटनास्थळी

खालापूर येथील इर्शाळवाडीत दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा २६ वर पोहचला आहे. बचाव पथकाकडून आतापर्यंत २६ जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत. बुधवारी रात्री झालेल्या या दुर्घटनेनंतर येथे बचावकार्य सुरू आहे.

दरम्यान, कोल्हापुरातील व्हाईट आर्मीचे २१ जवान बचावकार्यासाठी दुर्घटनास्थळी पोहचलेले आहेत. मातीच्या ढिगाऱ्या खाली सापडलेल्या गावकऱ्यांना बाहेर काढण्याचा काम व्हाईट आर्मीचे जवान करत आहेत.

देशभरात कुठेही नैसर्गिक आपत्ती झाली की कोल्हापुरातील व्हाईट आर्मीचे जवान मदतीसाठी धावून जात असतात, इर्शाळ वाडीत शासकीय यंत्रणेसोबत बचाव कार्य करत आहेत.

Raigad Landslide: सर्वांनी एकत्र व्हा, पुन्हा उभं राहा; उद्धव ठाकरेंकडून इर्शाळवाडीतील ग्रामस्थांचं सांत्वन

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज रत्नागिरीतील इर्शाळवाडी या दरडग्रस्त गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी स्थानिकांसोबत संवाद साधला. सर्वांनी एकत्र व्हा, पुन्हा उभे राहा, तुमचं पुनर्वसन होईपर्यंत मी तुमच्या सोबत आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी इर्शाळवाडीतील ग्रामस्थांचं सांत्वन केलं.

Buldhana Rain News: बुलढाण्यात पावसाचं थैमान, जोगेश्वरी नदीला महापूर; अनेक गावांचा संपर्क तुटला

जळगावच्या जामोद तालुक्यात सकाळपासूनच धो धो पाऊस कोसळत आहेत त्यामुळे येनगाव गावाजवळून वाहणाऱ्या जोगेश्वरी नदीला पूर आला आहे. परिसरातील शेतीमध्ये पुराचं पाणी शिरल्याने शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

तालुक्यातील नदी नाल्याना पूर आल्याने वडशिंगी व मडाखेड या दोन गावांचा जळगाव जामोद तालुक्याशी संपर्क तुटला आहे. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

Raigad Breaking News: कर्जतमधील जामरुख पाझर तलावाला गळती; प्रशासनाकडून संपूर्ण सोलनपाडा रिकामं

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी नाले दुधडी भरून वाहत असून रस्त्यांना तलावाचं स्वरूप आलं आहे. दरम्यान, कर्जत तालुक्यातील सोलनपाडा येथील जामरुख पाझर तलावाला गळती लागल्याची माहीती आहे.

यामुळे संपूर्ण गावात पाणी भरलं असून ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गावातील नागरिकांचे जवळच्या विजय भूमी विद्यापीठ इथं स्थलांतर करण्यात आलं आहे. दरम्यान, प्रशासनाकडून संपूर्ण गाव रिकामं करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस; रेल्वे वाहतूक उशिराने

मुंबई, ठाणे परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे कल्याणजवळ काही तांत्रिक बिघाड झाल्याने उपनगरीय रेल्वे आणि एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक उशिराने होत आहे.

Maharashtra Rain: कोल्हापुरात पावसाची संततधार सुरूच; पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल, प्रशासन अलर्ट मोडवर

गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत असून पाणी पातळी ३५ फूट १० इंचवर पोहोचली आहे. जिल्ह्यातील एकूण ६६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

दोन दिवसापूर्वीच पंचगंगा घाट येथे पाणी पात्राबाहेर पडल्याने आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरत असून संत गतीने पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झालं असून यंत्रणा देखील हाय अलर्टवर गेली आहे.

Maharashtra Rain Updates: कोल्हापुरात पावसाची संततधार सुरूच; पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल

Raigad Landslide News: आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली; पोलादपुर-महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक ठप्प

रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातलं असून अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. जिल्ह्यातील पोलादपुर महाबळेश्वर जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली आहे. प्रतापगड फाट्यापासून जवळच डोंगरानी छोट्या मोठ्या दगडी रस्त्यावर कोसळल्या आहेत. त्यामुळे सध्या घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून दरड हटवण्याचं काम सुरू आहे.

Maharastra Rain: यवतमाळमध्ये पावसाचं थैमान, पुराच्या पाण्यात ४० जण अडकले

यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. पैनगंगा नदीला मोठा पूर आल्याने आनंद नगर परिसरात पाणी शिरलं आहे. पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने अनेक जण पाण्यात अडकले.

पावसाचा जोर कायम असल्यामुळे जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. महागांव तालुक्यातील हिवरा संगम गट ग्रामपंचायत मधील आनंद नगर येथील चाळीस नागरिक बेटावर अडकले आहेत.

पूरस्थिती मुळे अनेकांची घरे गेली वाहून गेली आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने बचाव पथकांना अडथळे येत आहेत.

Maharastra Rain: मुसळधार पावसाने पश्चिम विदर्भाला झोडपलं; १.१७ लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान

पश्चिम विदर्भात ४८ तासांत ७२ महसूल मंडळात झालेल्या अतिवृष्टीनेे पश्चिम विदर्भातील नदी-नाल्यांना पूर येऊन काठा लगतची ६४८ हेक्टर शेतजमीन खरडल्या गेली. याशिवाय बांध फुटणे व शेतात पाणी साचल्याने किमान १ लाख १७,२०० हेक्टरमधील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाचा प्राथमिक अहवाल आहे.

या आपत्तीमुळे वीज पडून अमरावती जिल्ह्यात दोघांचा मृत्यू तर अंगावर भिंत पडून बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाले आहे, याशिवाय अमरावती जिल्ह्यात आठ जण जखमी झालेले आहे.

अमरावती जिल्ह्यात ३२२९ हेक्टर, अकोला जिल्ह्यात १४८०७ हेक्टर, यवतमाळ जिल्ह्यात १३३३ हेक्टर, वाशिम जिल्ह्यात ६१६८ व बुलडाणा जिल्ह्यात ९२२१३ हेक्टरमधील सोयाबीन, तूर, कापूस, उडीद व मूग पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे.

Irshalwadi Rescue Operation Live: इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; सकाळपासून बचावकार्य सुरू

Raigad Irshalwadi Rescue Operation Live: इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. एनडीआरएफच्या पथकाकडून सलग दुसऱ्या दिवशी बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत ११० नागरिकांची ओळख पटली आहे. अजूनही ७० ते ८० नागरिकांचा शोध लागलेला नाही.

सध्या एनडीआरएफ आणि टीटीआरएफचे सुमारे १०० हून अधिक प्रशिक्षित कर्मचारी वाडीवर तळ ठोकून आहेत. इतर पालिका, कंपन्या, सामाजिक संस्थांचे कर्मचारी वाडीवरून परत पाठवण्यात आले आहेत. धो-धो पडणारा पाऊस, सर्वत्र झालेला चिखल व तसेच मातीच्या ढिगाऱ्यांमुळे शोधकार्यात अनेक अडचणी येत असल्याचे बचावकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com