रणजीत माझगांवकर, साम टीव्ही कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात विषारी किटकनाशक प्यायल्यामुळे ११ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय. ही घटना कोल्हापुरातल्या राधानगरी येथील आमजाई व्हरवडे गावातील काल ६ जूलै रोजी घडली. वेदांत अशोक पाटील, असं अकरा वर्षीय मृत चिमुकल्याचं नाव आहे. वेदांतच्या मृत्युमुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
नक्की काय घडलं?
नेहमीप्रमाणे अकरा वर्षीय वेदांतच्या मागे शाळेत जाण्याची घाई होती. काल सकाळच्या सुमारास त्याने शाळेला जाताना गडबडीत खोकल्याचे औषध समजून किटकनाशक (Kolhapur News) प्यायलं. त्यामुळे त्याची तब्येत खालावली अन् त्याचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना राधानगरी येथील आमजाई व्हरवडे गावातून समोर आलीय.
खोकल्याचे औषध समजून किटक नाशक प्यायलं
खोकल्याचे औषध समजून किटक नाशक प्यायल्यामुळे वेदांतला अस्वस्थ वाटू लागलं (Death News) होतं. त्यामुळे त्याला तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वेदांतवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यानच वेदांचता मृत्यू झालाय. त्याच्या मृत्युमुळे कुटुंबावर मोठी शोककळा पसरली (Boy Dies Due To Drinking Insecticide) आहे.
पंजाबमधील घटना
अशीच एक घटना पंजाबमधून देखील जूनमधून समोर आली होती. पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता रणदीप सिंह भंगू याचा देखील वयाच्या ३२ व्या वर्षी किटकनाशकाचं औषध प्यायल्याने मृत्यू झाला (Cough Medicine) होता. दारू समजून किटकनाशकाचं प्यायल्याने त्याचा मृत्यू झाला होता. उपचारादरम्यान रणदीपचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.