Kolhapur Breaking: मोठी बातमी! कोल्हापुरात खुलेआम वेश्याव्यवसाय; मुख्यमंत्र्यांची शिवसेना आक्रमक, मध्यरात्री आंदोलन

Eknath Shinde Shiv Sena Group Protest Against Illegal Woman Workers: कोल्हापुरमध्ये खुलेआम वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू होता. याविरोधात मुख्यमंत्र्यांची शिवसेना आक्रमक झाल्याचं काल पाहायला मिळालं आहे.
कोल्हापुरात खुलेआम वेश्याव्यवसाय
Kolhapur BreakingSaam Tv

रणजित माजगांवकर, साम टिव्ही कोल्हापूर

कोल्हापुरमधून एक मोठी बातमी समोर आलीय. शहरातील विविध चौकांमध्ये रात्रीच्या वेळी खुलेआम वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला (Kolhapur News) आहे. व्हीनस कॉर्नर परिसरात मोठ्या प्रमाणात हा प्रकार सुरू होता. याविरोधात कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांची शिवसेना आक्रमक झाली. मध्यरात्री जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी आंदोलन केलंय. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथीयांना पिटाळून लावलं.

शिवसैनिकांचं कोंबिंग ऑपरेशन

शाहूपुरी पोलिसांनी अनेक महिला आणि तृतीयपंथीयांना यावेळी ताब्यात घेतलं. वेश्याव्यवसाय करणाऱ्या अनेक महिला व्हीनस कॉर्नर परिसरात असणाऱ्या अनेक लॉजमध्ये लपलेल्या होत्या. या लपलेल्या महिलांना शोधून काढत शिवसैनिकांनी कोंबिंग ऑपरेशन राबवलं. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात आंदोलन करण्यात आलं (Eknath Shinde Shiv Sena) होतं.

उग्र स्वरूपाचं आंदोलन

शहरातील वेश्याव्यवसायामुळे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर फोफावल्याचं मत शिवसैनिकांनी व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेच्या वतीने व्हीनस कॉर्नर परिसरात जोरदार घोषणाबाजी (Illegal Woman Workers) करत मध्यरात्री अचानक उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे शाहूपुरी पोलिसांची प्रचंड दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं.

कोल्हापुरात खुलेआम वेश्याव्यवसाय
Eknath Shinde VIDEO : आता तुमची खैर नाही, पाळंमुळं उखडून फेकणार; मुख्यमंत्र्यांचा ड्रग्ज विक्रेत्यांना इशारा

शिवसैनिकांनी काय इशारा दिला?

वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांच्या जीपमध्ये जाऊन बसल्याचं देखील समोर आलंय. 'हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है' असा शिवसैनिकांनी इशारा दिला (Shiv Sena Group Protest) आहे. मुख्ममंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांनी हे आंदोलन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली केलंय. या आंदोलनामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती.

कोल्हापुरात खुलेआम वेश्याव्यवसाय
Eknath Shinde: आमच्या सरकारच्या काळात लाभार्थ्यांमध्ये मोठी वाढ झाली; CM शिंदे यांनी आकडेवारी सांगितली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com