रणजीत माजगांवकर, साम टीव्ही
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक अर्थात केडीसीसी बँकेच्या खिद्रापूर शाखेतील कर्मचारी अभय रजपूत यांनी बँक ग्राहकांच्या एफडी ठेव पावत्या परस्पर मोडून त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या नावे वळवलेले आहेत. हा प्रकार बँकेचे लक्षात आल्यानंतर बँकेचे निरीक्षक ए एस पाटील यांनी खिद्रापूर बँकेचा अधिकारी राजकुमार चौगुले यांना फोनवरून या संदर्भातली माहिती विचारून ते पैसे ताबडतोब भरण्याच्या सूचना केलेल्या आहेत.
या संवादाची ऑडिओ क्लिप साम टीव्हीच्या हाती लागलेली आहे. तर याच प्रकरणांमध्ये राजकुमार चौगुले आणि बँकेचे एक निवृत्त अधिकारी यांच्यामधील संवादाची आणखीन एक ऑडिओ क्लिप साम टीव्हीच्या हाती लागलेली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये अभय रजपूत याने कशा पद्धतीने भ्रष्टाचार केलेला आहे. याचं वर्णन राजकुमार चौगुले याने एका निवृत्त अधिकाऱ्याला सांगितले आहे.
ए एस पाटील - तुमचं हे प्रकरण मोठ्या साहेबांपर्यंत गेलंं आहे, तुला जर बोलून घेतलं तर बघ काय होईल तुझे
राजकुमार - होय होय
ए एस पाटील - डोळे झाकून बसलेला आहात सगळे
राजकुमार - साहेब डोळे झाकलेले नाहीत, मात्र तो दररोज थापा मारत आहे, काय करणार?
ए एस पाटील - तुझ्या हलगर्जीपणामुळे बँकेची बदनामी झालेली आहे हे लक्षात ठेव , तुझ्या एकट्याच्या हलगर्जीपणामुळे हे सगळं घडलेलं आहे. ज्यावेळी के आर सोडून गेला तू कॅशियर म्हणून आलास आणि मोहन कांबळे तिथं शाखाधिकारी म्हणून बसला तेव्हापासून हे सगळं सुरू झालेलं आहे, तुझी कामाची काय पद्धत आहे, हे बघ!
राजकुमार - साहित्य जरा विश्वास ठेवला त्यामुळे हे सगळे झालं त्याने माझा गैर विश्वास केला, विश्वासघात केला.
ए एस पाटील - तुला झोप कशी लागतेय?
राजकुमार - साहेब कुठली झोप लागते आहे, माझी पण तब्येत बिघडलेली आहे.
ए एस पाटील - 80 हजार रुपये पगार घेतोस आणि झोपा काढतोय तिथं आणि दुसऱ्याचं मी त्रास एमडी पासून संचालकांपासून सगळ्या खालच्या वर्गापर्यंत
ए एस पाटील - तुझ्याकडे कंत्राटी क्लार्क असताना तुला युजर आयडी देण्याची काय गरज होती राजा
राजकुमार - होय नाहीच की बरोबर आहे साहेब
ए एस पाटील - आज तिघं मिळून किती भरता येते सांगा आता आज पावत्या आल्या तर पैसे वर्गणी काढून द्या तिथं नाहीतर याचा स्फोट झाला तर बँक फौजदारी करणार वारणा बँक सारखा .... वरची सालटच काढतात आणि पहिली बातमी पेपरला येते ती जर नको असेल तर आज वर्गणी काढायची आणि थोडे पैसे भरायचे तिथं
शाखाधिकारी राजकुमार चौगुले आणि एक निवृत्त अधिकारी यांच्यातला या भ्रष्टाचारासंदर्भातला संवाद
एक निवृत्त अधिकारी - त्या अभयला सारखं खिद्रापूरला बोलावून घेत आहेत त्यांना काय केलंय
राजकुमार चौगुले - होय कोणाला बोलू नका... गोलमाल केलेला आहे उंडगीच्याने... त्यांना त्याच्या आणि त्याच्या बायकोच्या खात्यावर लोकांच्या पावत्या मोडून जमा करून घेतलेल्या आहेत...
निवृत्त अधिकारी - मग आता त्याला एकट्याला होणार की इतरांना सुद्धा
राजकुमार - आता बँक काय करेल ते करेल माझं नाव आहे शिंदे बाईचं नाव आहे त्याने विश्वासघात केलेला आहे थर्ड क्लास आहे तो...
निवृत्त अधिकारी - तो दिवस तिथ आला होता पण एक दिवस सुद्धा त्याला थांबवून घेत नाहीत
राजकुमार - होय त्याची चौकशी चालू झालेली आहे ए एस पाटील रोज तिथं आहेत, त्याने काय काय केलेलं आहे ते सगळं काढत आहेत तुम्ही कुणाला बोलू नका...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.