Kolhapur Crime: मेसेज करायला लावायचा,अभ्यासाच्या नावाने केबिनमध्ये बोलवून नको ते करायचा; प्राध्यापकाचे विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

Professor Misbehaving With Student : कोल्हापूरमधील एका नामांकित महाविद्यालयातून एका प्राध्यापकाने विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Professor Misbehaving  With Student :
A case has been registered against a professor for misbehaving with a student in a college in Kolhapur.saam tv
Published On
Summary
  • एका विद्यार्थिनीला आपल्या केबिनमध्ये बोलावून तिच्याशी गैरवर्तन केलं.

  • पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

  • या प्राध्यापकाने ४ ते ५ विद्यार्थिनींनाही टार्गेट केल्याची माहिती.

कोल्हापूरच्या एका नामांकित कॉलेजमध्ये प्राध्यापकाने विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महाविद्यालयाच्या प्राध्यापकानं विद्यार्थिनीला वर्गात 'टार्गेट' करत तिला केबिनमध्ये बोलवलं. त्यानंतर तिच्याशी अश्लील वर्तन केल्याची खळबळजनक प्रकार घडलाय. या घटनेनंतर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात प्राध्यापकाविरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आलाय. धक्कादायक बाब म्हणजे या प्राध्यापकाने चार ते पाच विद्यार्थिनींशी गैरवर्तन केले आहे. याप्रकरणामुळे कोल्हापूरात खळबळ माजली आहे.

Professor Misbehaving  With Student :
Shocking : बॉयफ्रेंडच निघाला हैवान; उसाच्या शेतात नेत ८ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, अत्याचारानंतर पीडितेसोबत केलं भयंकर

प्राथमिक माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून प्राध्यापक विद्यार्थिनीसोबत अशा प्रकारे गरवर्तन करत होता. शेवटी कंटाळून पीडितेने पोलिसांत धाव घेत सदर प्रकरणी तक्रार नोंदवली. यानंतर कोल्हापुरच्या शैक्षणिक क्षेत्रातही यामुळं खळबळ उडाली. अश्लील वर्तन करणारा प्राध्यापक वर्गात शिकवत असताना त्यानं काही विद्यार्थिनींना जाणीवपूर्वक 'टार्गेट' करण्यास सुरुवात केली. अभ्यासाच्या किंवा कामाच्या बहाण्यानं तो विद्यार्थिनींना केबिनमध्ये बोलवून तिथं कोणीही नसल्याचा फायदा घेत त्यांच्याशी अश्लील वर्तन करायचा.

Professor Misbehaving  With Student :
Famous Singer Arrested: दारू पिऊन गाडी चालवणं पडलं महागात; प्रसिद्ध गायिकेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पीडिता विद्यार्थिनी मुळची पंढरपूरची आहे, ती कोल्हापूरात शिक्षणासाठी आली आहे. एलओडी असणाऱ्या प्राध्यापकांनी तिच्याशी गैरवर्तन केल्याचा हा प्रकार घडला. अधिकृत माहितीनुसार २० जानेवारी रोजी आरोपी पीडितेच्या वर्गात शिकवण्यासाठी आला. त्याने अचानकच विद्यार्थिनीवर प्रश्नांचा भडीमार सुरू केला, त्याच्या काही प्रश्नांना विद्यार्थिनींना उत्तरं देता आली नाहीत. इथंच न थांबता त्या विद्यार्थिनीला अभ्यासासंदर्भात विचारपूस करण्याच्या बहाण्यानं तिला केबिनमध्ये बोलवलं. त्यानंतर त्याने पीडितेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

आरोपी प्राध्यापक इतरही विद्यार्थिनींशी मैत्री करू पाहत होता. व्यायाम करत जा, मेडिटेशन करत जा, मला मेसेज करत जा असे निरोप तो या मुलींना देत असायचा. अडचणी आल्या तर मला सांगत जा. 'मला जवळच्या मित्रासारखा वागव गं' असं म्हणत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करत असायचा असं पीडितेने आपल्या तक्रारी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com