Rohit Pawar: कर्जतचं राजकारण तापलं! अविश्वास ठरावाआधीच नगराध्यक्षांचा राजीनामा, रोहित पवारांना मोठा धक्का

Usha Raut Steps Down Karjat Nagaradhyaksha Resigns Amidst Political Turmoil: अविश्वास ठरावाआधीच कर्जातच्या नगराध्यक्ष उषा राऊत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच यावेळी त्यांनी सभापती राम शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत.
karjat political news
karjat political newsSaam
Published On

कर्जतच्या नगराध्यक्ष उषा राऊत यांनी नुकतंच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवला आहे. उषा राऊतांवर नव्या कायद्यानुसार, दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर जिल्हाधिकार्‍यांनी आज अकरा वाजता विशेष सभा आयोजित केली होती. मात्र, त्याआधीच उषा राऊत यांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा सोपवल्यामुळे या घटनेचे गांभीर्यच संपल्याचे बोलले जात आहे.

नगरसेवकांची फोडाफोडी

कर्जत नगरपंचायत आमदार रोहित पवार यांच्या ताब्यात आहे. त्यांना धक्का देण्यासाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तब्बल आठ नगरसेवक फोडले होते. नव्या कायद्यासाठी शिंदे यांनीच पाठपुरावा केला आहे. त्यानुसार कर्जतच्या नगराध्यक्ष राऊत यांच्या विरोधात सत्ताधारी ११ नगरसेवकांसह भाजपाच्या २ अशा १३ नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.

karjat political news
Pune News: इन्स्पेक्टरच्या खुर्चीत ऐटीत बसला, पोलीस कर्मचाऱ्याचा फोटो लिक; पण फोटो व्हायरल झालाच कसा? याच्या तपासावर भर

रोहित पवारांना मोठा धक्का

कर्जत नगरपंचायतमध्ये महाविकास आघाडीत देखील फूट पडली आहे. काँग्रेसचे तीन नगरसेवक देखील रोहित पवार यांच्या विरोधात गेले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर रोहित पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

karjat political news
Crime: आधी लग्नाचे आमिष दाखवून धर्मांतर, मग पीडित महिला अन् मुलीवर बलात्कार; विधवा महिलेसोबत आरोपीने नको ते..

माझ्यावर अन्याय झाला

'माझ्या कामात कुठेच काही दोष आढळून येत नसल्याने फक्त माझे पद घालवण्यासाठी थेट विधानपरिषदेचे सभापती राम शिंदेंनी पदाचा गैरवापर कायदा करत माझ्यावर अन्याय करण्याची भूमिका घेतली' असा आरोप नगराध्यक्ष उषा राऊत यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com