Crime: आधी लग्नाचे आमिष दाखवून धर्मांतर, मग पीडित महिला अन् मुलीवर बलात्कार; विधवा महिलेसोबत आरोपीने नको ते..

Uttar Pradesh Crime: एका नराधमाने विधवा महिलेवर आणि तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. तसेच धर्म परिवर्तन करण्यासाठी पीडितेवर दबावही टाकला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
up rape
up rapeSaam Tv
Published On

एक धक्कादायक बातमी उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातून समोर येत आहे. एका नराधमाने विधवा महिलेवर आणि तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. तसेच धर्मांतर करण्यासाठी पीडितेवर दबावही टाकला होता. इतकंच नाही, आरोपीने आपल्या भावालाही पीडित महिलेच्या मुलीवर बलात्कार करण्यास सांगितले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

मोहल्ला जुलाहान येथील रहिवासी रिझवान असे आरोपीचे नाव आहे. तर, पीडित महिला विधवा असून, उदरनिर्वाहसाठी महिला एका ब्यूटी पार्लरमध्ये काम करत होती. ५ वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले होते. याच गोष्टीचा फायदा घेत आधी नराधमाने महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

up rape
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना साद घालताच भाजपमध्ये रूसवा? राज ठाकरेंच्या बंगल्याजवळ भाजपची बॅनरबाजी; फोटो व्हायरल

नंतर लग्नाचे आमिष दाखवून धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. तसेच तिचे नावही बदलले. आरोपीने वारंवार बलात्कार केला. ज्यामुळे ती गर्भवती राहिली. आरोपी फक्त यावर थांबला नाही. त्याने पीडित महिलेच्या मुलीवरही बलात्कार केला. तसेच आरोपीने आपल्या भावालाही पीडित महिलेच्या मुलीवर बलात्कार करण्यास सांगितले.

up rape
Shocking: डीजेच्या तालावर बेभान होऊन नाचला! अचानक खाली कोसळला, लग्नाच्या वरातीत नेमकं काय घडलं?

अल्पवयीन मुलीने तिच्या आईला संपूर्ण घटनेची माहिती दिली, त्यानंतर पीडित आई आणि मुलीने बिजनौर जिल्ह्यातील शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोन्ही भावांविरुद्ध बलात्कार, पॉक्सो कायदा आणि धर्मांतराच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com