अभिजीत देशमुख
कल्याण : महावितरणच्या पथकाने आज डोंबिवली खोणी गावात मोठी कारवाई केली. श्रीमंत ग्रामपंचायत अशी ख्याती (Kalyan) असलेल्या खोनी ग्रामपंचायत हद्दीत एकाच दिवसात तब्बल २०० वीजचोरी महावितरणने (Mahavitaran) उघड केल्या. धक्कादायक म्हणजे खोणी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात देखील चोरून वीजपुरवठा सुरू असल्याचे देखील यावेळी महावितरणदर्शनास आले. (Tajya Batmya)
कल्याण ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असल्याचे महावितरणच्या निदर्शनास आले. गेल्या काही दिवसांपासून महावितरणच्या पथकाकडून कल्याण ग्रामीण परिसरातील वीजचोरीबाबत कारवाई सुरू आहे. ग्रामीण भागातील खोणी गावामध्ये महावितरणचे पथक, पोलीस कर्मचारी या वीजचोरी (Electricity Theft) विरोधात कारवाई करण्यासाठी गेले. ही कारवाई सुरू असताना जमावाने कारवाईस विरोध करत महावितरणच्या पथकातील कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. आज झालेली कारवाई ही राज्यात एकाच गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात वीज चोरीची ही पहिलीच घटना आहे.
५० भरारी पथक अन् पोलिस बंदोबस्त
यानंतर आज सकाळीच महावितरणची ५० भरारी पथक प्रचंड पोलीस बंदोबस्त घेऊन खोणी गावात आले. आज सकाळपासून वीज चोरीबाबत सुरु असलेल्या या मोहिमेत तब्बल २०० चोरीचे वीज कनेक्शन महावितरण उघड करत कारवाई केली. धक्कादायक बाब म्हणजे खोणी ग्रामपंचायत कार्यालयाला देखील चोरून वीज पुरवठा असल्याचे या कारवाईदरम्यान उघड झाले. याप्रकरणी महावितरणने या सर्वांचा वीज पुरवठा खंडित करत पुढील कारवाई सुरू केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.