धाराशिवच्या कळंबमध्ये भीषण अपघात; ट्रकखाली येऊन ५५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू

Woman Killed In Truck Accident In Kalamb Dharashiv: धाराशिवच्या कळंब शहरातील अहिल्याबाई होळकर चौकात भीषण अपघातात ५५ वर्षीय महिलेचा ट्रकखाली येऊन जागीच मृत्यू झाला.
A tragic scene at Ahilyabai Holkar Chowk in Kalamb where a 55-year-old woman lost her life after being run over by a speeding truck.
A tragic scene at Ahilyabai Holkar Chowk in Kalamb where a 55-year-old woman lost her life after being run over by a speeding truck.Saam Tv
Published On

बालाजी सुर्वसे, साम टीव्ही

कळंब शहरात रस्ता ओलांडताना झालेल्या भीषण अपघातात ५५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना शहरातील अहिल्याबाई होळकर चौक येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ईद निमित्त आपल्या लेकीला भेटण्यासाठी आलेल्या शमीम शेख या मुलीसह रस्ता ओलांडत असताना भरधाव ट्रकखाली आल्या. यावेळी ट्रकच्या टायरखाली डोके आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

A tragic scene at Ahilyabai Holkar Chowk in Kalamb where a 55-year-old woman lost her life after being run over by a speeding truck.
Accident: कल्याणमधील रिंग रोडवर अपघाताचा थरार, भरधाव कारने सायकलस्वाराला चिरडलं; थरकाप उडवणारा VIDEO

दरम्यान, या अपघातानंतर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शहरातील मुख्य चौकांमध्ये वाढलेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होत असून अपघातांचे प्रमाण वाढल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हातगाड्या आणि फेरीवाल्यांमुळे वाहनचालक व पादचारी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. ऐन सणासुधीच्या दिवसांत हा अपघात झाल्याने कुटुंबात शोककळा पसरली आहे.

A tragic scene at Ahilyabai Holkar Chowk in Kalamb where a 55-year-old woman lost her life after being run over by a speeding truck.
Rupali Chakankar resignation : रूपाली चाकणकरांना आणखी एक धक्का, महिला प्रदेशाध्यक्षपद जाणार, मोठी अपडेट आली समोर

24 वर्षीय युवकाचा ट्रॅक्टरखाली दबून दुर्दैवी मृत्यू

दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील काकोडा येथे 24 वर्षीय युवकाचा ट्रॅक्टरखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घडली आहे. गणेश उर्फ बंडू पाटील मानखैर हा युवक शेतात नांगरणी करत असताना ट्रॅक्टरचे वळण घेताना तोल सुटल्याने ट्रॅक्टर अवजारांसह ओसाड विहिरीत पलटी झाला.

या अपघातात तो ट्रॅक्टरखाली दबला गेला. स्थानिकांनी त्याला बाहेर काढून उपचारासाठी शेगावकडे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मृत गणेश हा अल्पभूधारक कुटुंबातील असून मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. या घटनेमुळे काकोडा गावात शोककळा पसरली असून गावकऱ्यांनी शासनाकडून तातडीने आर्थिक मदतीची मागणी केली आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com